फुटबॉल स्पर्धा: सेंट मॅथ्यूज ऍकॅडमीचा दणदणीत विजय

माउंट मेरी स्कूलवर 11-0ने मात, कुणवरपालचे सात गोल
रिलायन्स फाउंडेशन यूथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा

पुणे: कुणवरपाल नट्टच्या सात गोलच्या जोरावर माउंट मेरी स्कूलवर 11-0ने मात करताना सेंट मॅथ्यूज ऍकॅडमीजने रिलायन्स फाउंडेशन यूथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या गटात आगेकूच केली. डेनोबिल्ली कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

-Ads-

सेंट मॅथ्यूज संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून माउंट मेरी स्कूलच्या खेळाडूंना संधी दिली नाही. हा या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक गोल झालेला सामना ठरला. त्याचबरोबर पहिल्यांदाच या मोसमातील स्पर्धेतील एका सामन्यात दहाहून अधिक गोल झाले. या लढतीत कुणवरपालने 1, 8, 16, 22, 42, 46 आणि 48 मिनिटाला गोल केले. त्याला हर्ष मालेवारने तीन, तर वेदांत निकमने एक गोल करून चांगली साथ दिली.

अन्य सामन्यांत सरदार दस्तूर होर्माझिदार को-एज्युकेशन संघाने लोकनेते यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूलवर 6-1ने मात केली. सरदार दस्तूरकडून आर्श खान (1, 23 मि.), कौशिक परदेश (10 मि.), अनिश जोशी (30 मि.), यश चव्हाण (41 मि.) आणि अतिफ शेख (43 मि.) यांनी गोल केले. चव्हाण स्कूलकडून विजय तोमरने (32 मि.) एकमेव गोल केला. वरिष्ठ गटातील लढतीत अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूलने बोस्टन वर्ल्ड स्कूलवर टायब्रेकमध्ये 7-5 ने मात केली.

सविस्तर निकाल –
बाद फेरी- ज्युनियर मुले – 1) मॅथ्यूज अकॅडमी – 11 (कुणवरपाल नट्ट 1, 8, 16, 22, 42, 46 व 48वे मि., वेदांत निकम 6वे मि., हर्ष मालेवर 10, 19 व 45वे मि.) वि. वि. माउंट मॅरी स्कूल – 0.
2) हिंद इंग्लिश मीडियम स्कूल गुरुकूल – 3 (सिद्धान्त शेट्टी 21वे मि., दिव्यांश दुबे 31वे मि., अमन यादव 45वे मि.) वि. वि. स्वर्गीय विठ्ठल तुपे – 1 (यशराज अटोळे 23वे मि.).

3) सरदार दस्तूर होर्माझिदार को-एज्यु. – 6 (आर्श खान पहिले व 23वे मि., कौशिक परदेश 10वे मि., अनिश जोशी 30वे मि., यश चव्हाण 41वे मि., अतिफ शेख 43वे मि.) वि. वि. लोकनेते यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूल – 1 (विजय तोमर 32वे मि.)
4) पुणे इंटरनॅशनल स्कूल – 2 (आरुष रावत 17 व 46वे मि.) वि. वि. मदर टेरेसा स्कूल – 0.
सीनिअर मुले – अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल – 3 (4) (सादिक शेख 41, 44 व 59वे मि.; आदिल शेख, इब्राहिम शेख, सादिक शेख, आरिफ शेख) वि. वि. बोस्टन वर्ल्ड स्कूल – 3 (2) (मन बिस्त 20वे मि., मानव सहेरिया 22वे मि.; गगन खुशालदासानी 20वे मि., जॉय पदालिया, युसूफ बुदगुईझार).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)