फुटबॉल स्पर्धा: नेस वाडिया आणि नौरोसजी वाडिया संघांची विजयी आगेकूच 

रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा 
पुणे: नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नौरोसजी वाडिया कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील वरिष्ठ (सीनियर) मुलांच्या गटात विजयी आगेकूच नोंदवली आहे. 
डेनोबिल्ली कॉलेज ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स संघाने द बिशप्स को-एज्युकेशन स्कूल, कल्याणीनगरचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. यावेळी नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सकडून अभिषेक जाधव याने सामन्याच्या 7 व्याच मिनिटाला गोल नोंदवताना सुरेख सुरुवात करुन दिली. मात्र, बिशप्स संघाच्या ध्येय रावने 10 व्याच मिनिताला गोल करत बरोबरी साधली. यानंतर सामन्याच्या 45 व्या मिनिटा पर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते.
मात्र, वाडियाच्या दिनेश सुतारने 45 व्या मिनिटाला गोल करत वाडियाला विजयी आघाडी मिळवून दिली.तर दुसऱ्या एका सामन्यात प्रोडिगी पब्लिक स्कूलने एअर फोर्स स्कूलवर 3-1ने विजय मिळवला. यात प्रोडिगी पब्लिक स्कूलकडून निश्‍चल भारद्वाज (8 मि.), आयुष तन्वर (18 मि.), तनिष्क शर्मा (28 मि.) यांनी गोल केले, तर, एअर फोर्स स्कूलकडून सुमन्यू अलोन (40 मि.) याने एकमेव गोल केला. तिसऱ्या लढतीत नौरोसजी वाडिया कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स संघाने भारतीय जैन संघटना संघाचा 2-1 ने पराभव केला. यात नौरोसजी वाडिया कॉलेजकडून राजू राम (9 मि.) आणि अमीर राठोड (22 मि.) यांनी गोल केले, तर भारतीय जैन संघटना संघाकडून एकमेव गोल यश देशमुखने (6 मि.) केला. 
यावेळी ज्युनियर मुलांच्या गटात स्टेला मॅरिस स्कूलने डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूलवर 2-1 ने मात केली. यात आर्यन कांचनने (16 मि.) स्वयंगोल केला, चैतन्यने 20 व्या मिनिटाला गोल करून स्टेला मॅरिस स्कूलला विजय मिळवून दिला. पूनावाला स्कूलकडून ऋत्विक सनसने (50 मि.) गोल केला. 
 
सविस्तर निकाल : ज्युनियर मुले – स्टेला मॅरिस स्कूल – 2 (आर्यन कांचन 16 मि. (स्वयंगोल), चैतन्य 20 मि.) वि. वि. डॉ. सायप्रस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल – 1 (ऋत्विक सनस 50 मि.). 
सीनियर मुले – नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स – 2 (अभिषेक जाधव 7 मि., दिनेश सुतार 45 मि.) वि. वि. द बिशप्स को-एज्यु स्कूल, कल्याणीनगर – 1 (ध्येय राव 10 मि.); प्रोडिगी पब्लिक स्कूल – 3 (निश्‍चल भारद्वाज 8 मि., आयुष तन्वर 18 मि., तनिष्क शर्मा 28 मि.) वि. वि. एअर फोर्स स्कूल – 1 (सुमन्यू अलोन 40 मि.). नौरोसजी वाडिया कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स – 2 (राजू राम 9 मि., अमीर राठोड 22 मि.) वि. वि. भारतीय जैन संघटना – 1 (यश देशमुख 6 मि.). 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)