फुटबॉल स्पर्धा: गतविजेत्या स्पायसर युनिव्हसिर्टीची विजयी सलामी

रिलायन्स फाऊंडेशन यूथ फुटबॉल स्पर्धा

पुणे: गतविजेत्या स्पायसर ऍडव्हर्टाईज युनिव्हर्सिटी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा एकतर्फी पराभव करताना रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्टस्‌ फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेत विजयी सलामी दिली. अन्य सामन्यांत सिम्बायोसिस सेकंडरी स्कूल, स्पायसर हायर सेकंडरी स्कूल आणि द ऑर्चिड स्कूल यांनी आपापल्या गटांत विजयी आगेकूच केली.

-Ads-

स्पायसर युनिव्हर्सिटी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयीन मुलांच्या गटांत स्पायसर ऍडव्हर्टाईज युनिव्हर्सिटी संघाने एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी संघाचा 5-0 असा सहज पराभव केला. यामध्ये शमय अशिमरय याने तीन गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वरिष्ठ गटातील लढतीत स्पायसर हायर सेकंडरी स्कूल संघाने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स संघाचा 5-1 असा एकतर्फी पराभव करीत आगेकूच केली. हर्ष स्वानसीने तीन गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. बृहन्महाराष्ट्र कॉलेजकडून आदित्य रणदिवेने एकमेव गोल केला. याच गटातील आणखी एका लढतीत द ऑर्चिड स्कूल संघाने एसएनबीपी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला.

कुमार गटातील सामन्यांत जयेश चौधरी याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर सिम्बायोसिस सेकंडरी स्कूलने भारतीय विद्या भवन संघाचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली. तसेच शालेय मुलींच्या गटात स्पाईसर हायर सेकंडरी स्कूलने अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचा 4-0 असा सहज पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पाईसरकडून सेनोरिटा एन. आणि निशाली जॉर्ज यांनी प्रत्येकी एक आणि फ्रीसिया एन. हिने दोन गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

सविस्तर निकाल
बाद फेरी – महाविद्यालयीन मुलांचा गट – स्पायसर ऍडव्हर्टाईज युनिव्हर्सिटी – 5 (शमय अशिमरय 26, 39 व 58वे मि., मेहिलांग कामेरी 28वे मि., पौटेंगटुंग 57वे मि) वि.वि. एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी – 0;
कुमार गट – सिम्बायोसिस सेकंडरी स्कूल – 2 (जयेश चौधरी 14 व 43वे मि.) वि.वि. भारतीय विद्या भवन – 1 (तरल मुनोत 40वे मि.);
वरिष्ठ गट – स्पायसर हायर सेकंडरी स्कूल – 5 (हर्ष स्वानसी 1, 11 व 36वे मि., त्यामेई पमथीड 15वे, डॅनियल पॉल 49वे मि.) वि.वि. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स – 1 (आदित्य रणदिवे 32 मि.);
द ऑर्चिड स्कूल – 1 (किशोर पांड्या 11वे मि.) वि.वि. एसएनबीपी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज – 0;
शालेय मुली – स्पायसर हायर सेकंडरी स्कूल – 4 (सेनोरिटा एन. तिसरे मि., फ्रीसिया एन. 10 व 42वे मि., निशाली जॉर्ज 12वे मि.) वि.वि. अक्षरा इंटरनॅशनल स्कूल – 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)