फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा : स्पेनचे निलंबित प्रशिक्षक नवा कार्यभार स्वीकारणार 

विश्‍वचषक स्पर्धेच्या पूर्वसंध्येला निलंबित होण्याची नामुष्की स्पेनचे प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांच्यावर काल आली होती. काही दिवसांपूर्वीच राजीनामा देणाऱ्या झिनेदिन झिदान यांच्या जागी लोपेटेगुई यांची नेमणूक केल्याचे रेयाल माद्रिदने जाहीर केल्यामुळे स्पेनच्या विश्‍वचषक स्पर्धेचे नियोजन कोलमडले होते. लोपेटेगुई यांनी काही दिवसांपूर्वीच स्पॅनिश फुटबॉल महासंघाशी 2020 पर्यंत करार केला होता. त्यामुळे स्पेनने लोपेटेगुई यांची तत्काळ हकालपट्टी केली होती. परंतु त्या घटनेला चोवीस तास उलटण्याच्या आतच त्यांचे रेयाल माद्रिद संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून अधिकृतरीत्या सादरीकरण होणार आहे. पुढच्या तीन मोसमांसाठी लोपेटेगुई हे रेयाल माद्रिदचे मुख्य प्रशिक्षक असतील. स्पेनच्या खेळाडूंनी लोपेटेगुई यांच्या हकालपट्टीला विरोध केला होता. परंतु फर्नांडो हायरो यांनी लगेचच कार्यभार स्वीकारल्यामुळे आणि स्पेनची पोर्तुगालविरुद्ध पहिली लढत लगेचच असल्याने हा वाद सध्या तरी शमला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)