फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा : भारतातील फुटबॉलप्रेमींमध्ये विश्‍वचषकाची धूम 

वास्तविक पाहता भारतीय फुटबॉल संघ विश्‍वक्रमवारीत पहिल्या 100 संघांमध्येही नाही. विश्‍वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याकरिता भारताला आणखी अनेक दशके नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील. तरीही क्रिकेटवेड्या भारतीय क्रीडाशौकिनांमध्ये काही निवडक ठिकाणी विश्‍वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलशौकिनांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. गोवा, बंगाल किंवा कोलकाता, केरळ, तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी फुटबॉलला मिळणारा पाठिंबा आश्‍चर्यकारक खराच. यंदाचा मोसमही त्याला अपवाद नाही. गोव्याच्या फुटबॉलशौकिनांमध्ये रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ सर्वाधिक लोकप्रिय असून पूर्व भारतात नेमार व ब्राझिल संघ, तसेच दक्षिण भारतातील मलाप्पुरम, कोझिकोडे व सकारागोड येथे मेस्सी व अर्जेंटिना यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. या सर्व ठिकाणी विश्‍वचषकासाठी खास तयारी करण्यात आली आहे. पोर्तुगाल, स्पेन, जर्मनी व फ्रान्स यांचेही चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत.

रेस्टॉरंट्‌सनी फुटबॉलसाठी वेगळी सजावट आणि रोषणाई केली असून सामने पाहण्यासाठी भव्य स्क्रीन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.अर्थात प्रत्येक फुटबॉलशौकिनाची सामन्याचा आनंद घेण्याची एक आवडती जागा तयार होत असते. त्यामुळे क्रीडाशौकिनांना कोणतेही रेस्टॉरंट चटकन आपलेसे वाटण्यासाठी योग्य सजावट करण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. अर्जेंटिनाच्या संघासाठी नुकत्याच पार पडलेल्या एका “रोड शो’ला फुटबॉलशौकिनांनी भरघोस प्रतिसाद दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)