फुटक्‍या फरशांमुळे जलतरणाला धोका

तलावायन भाग 5

पिंपरी – जुन्या सांगवीतील बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाला समस्यांनी ग्रासले आहे. या जलतरण तलावातील भिंतीवरील कड्डपे व जलाशयातील काही फरश्‍या तुटल्याने जलतरणप्रेमी जखमी होत असल्याचे समोर आले आहे.

-Ads-

या तलावाची क्षमता 200 ते 250 लोक पोहू शकतील एवढीच आहे. मात्र उन्हाळा सुरु झाल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून हा तलाव अपुरा पडत आहे. तर येथे केवळ एक सुरक्षा रक्षक व दोनच जीव रक्षक असल्याने गर्दीच्या वेळी व्यवस्थापनावर ताण येत असतो. या जलतरण तलावाबाहेर हॅलोजन बसवला असून तो बंद पडला आहे. त्यामुळे सकाळी लवकर येणाऱ्या नागरिकांना अंधारातच धडपडावे लागत आहे. तसेच येथील स्वच्छतागृहातील शॉवरची मोडतोड केली गेली असून येथील लॉकर व्यवस्थाही खराब झाली आहे. लॉकर सिस्टम एकदम जूणी असून ती गंजून गेली आहे. त्यामुळे येथे लॉकरची अद्यावत सिस्टम करण्याची गरज आहे.

जलतरण तलाव परिसरातील विद्युत पुरवठ्याची व्यवस्थाही खराब झाली असून नागरिकांना सकाळी अंधारातच पोहायला लागत आहे. तसेच येथे नागरिकांसाठी लावण्यात येणाऱ्या सुचना फलकाचा अभाव दिसून आला. तसेच येथे बेबी टॅंक नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी येथे स्वतंत्र बॅचेस घ्याव्यात अशी मागणी काही पालकांनी केली. जलतरण तलावाबाहेर स्वच्छतेचा अभाव दिसून आला. तर काही तरुण वाहतनळाच्या जागेत क्रिकेट खेळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थाही दक्ष नसल्याचे स्पष्ट झाले.

नागरिकांच्या मागण्या –
– लहान मुलांसाठी बेबी टॅंकची सोय करावी
– पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस वाढवाव्यात
– कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
– मोडलेले शॉवर त्वरीत दुरुस्त करावेत
– तलावातील फुटक्‍या फरशा व कड्डापे दुरुस्त करावेत
– लॉकर सिस्टम अद्यावत करण्यात यावी.
– जीव रक्षकांसाठी रिंग व बांबूची सोय करावी
– जखमींवर उपचारासाठीचे साहित्य उपलब्ध करावे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)