फुझोहू ओपन बॅडमिंतन स्पर्धा: सिंधूची दुसऱ्या फेरीत धडक

संग्रहित छायाचित्र.....

फुझोहू (चीन): यंदाच्या मोसमाच्या प्रारंभापासूनच महत्वाच्या स्पर्धांच्या विजेतेपदापासून वंचित असलेल्या पी. व्ही. सिंधूने चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची पहिली फेरी सहज पार करताना रशियाच्या इव्हेग्निया कोसेत्सकायावर एकतर्फी मात करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

फुझोहू ओपन बॅडमिंतन स्पर्धा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या पी. व्ही. सिंधूची सलामीची लढत रशियाच्या एव्हगेनिया कोसेट्‌सकाया विरुद्ध झाली. यावेळी या सामन्यात सिंधूने इव्हेग्नियाचा 21-13, 21-19 असा सहज आणि एकतर्फी पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली. यावेळी सामन्याच्या सुरुवाती पासूनच सिंधूने इव्हेग्नियावर वर्चस्व गाजवताना सामन्याच्या पहिल्या गेम पासूनच दबाव वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे सिंधूने पहिला सेट 21-13 असा एकतर्फी आपल्या नावे केला. पहिला सेट सहज गमावल्याने दबावात आलेल्या एव्हेग्नियाला सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना चांगला खेळा दाखवला. मात्र, तिने दुसरा सेटही 21-19 असा गमावला. यावेळी सिंधूने हा सामना केवळ 30 मिनिटांमध्येच आपल्या नावे केला.

या वर्षी प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सिंधूने पाच वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, त्या सर्व स्पर्धामध्ये तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली. त्यातच मागिल स्पर्धेत उपान्त्यापूर्व फेरीतच तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात तिने चांगली करताना या स्पर्धेचा शेवट विजेतेपदाने करण्याची तयारीकेल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेत सिंधूने जर आपली विजयी लय कायम ठेवत अशीच आगेकूच सुरु ठेवली तर उपान्त्य फेरीत तिची झुंज जपानच्या अव्वल टेनिसपटू नोझोमी ओकुहारा हिच्याशी होण्याची शक्‍यता आहे. अर्थात त्यासाठी दोघींनाही त्यापूर्वीचे सर्व सामने जिंकणे आवश्‍यक आहे.

ऑलिम्पिक सुवर्णविजेती स्पेनची कॅरोलिन मारिन आणि जपानची अकाने यामागुची या दोघी दुसऱ्या गटात असल्याने त्यांचा एकमेकींशी सामना होण्याची शक्‍यता आहे. या दोघींचा सामनाही रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. या चार खेळाडूंनाच महिला एकेरीच्या विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. सिंधूशिवाय वैष्णवी रेड्डी जक्का ही भारताची दुसरी बॅडमिंटनपटू सर्वाचे लक्ष वेधण्यास सज्ज झाली आहे. तिचा पहिला सामना आज थायलंडच्या पोरनपावी चोचुवॉंग हिच्याशी होणार आहे.

पुरुषांच्या गटात, भारताच्या आशा प्रामुख्याने किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय या दोन अव्वल बॅडमिंटनपटूंवर आहेत. हे दोघेही खेळाडू प्रदीर्घ काळापासून मोठया विजेतेपदापासून वंचित आहेत. त्यामुळे या स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. श्रीकांत आणि प्रणॉय यांचे सामने बुधवारी होणार आहेत.

मनू-सुमितवर दुहेरीत आशा
दुहेरीत भारताच्या आशा मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांच्यावर आहेत. त्यांचा सामना डेन्मार्कच्या किम ऍस्टरूप आणि आंद्रेस स्कारूप रॅसमुसेन यांच्याशी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)