फुझोहू ओपन बॅडमिंटन स्पर्धा : किदंबी श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक 

एच.एस.प्रनोय, वैश्‍नवी सिक्‍कीरेड्डीचे आव्हान संपुष्टात 

फुझोहू (चीन): येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली असून भारताचा दुसरा खेळाडू एच.एस.प्रनोयचा पहिल्याच फेरीत पराभव झाल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर महिला एकेरीत भारताची अव्वल खेळाडू वैश्‍नवी सिक्‍कीरेड्डीचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्याने महिला एकेरीत आता भारताच्या सर्व आशा अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही.सिंधूवर आहेत.

यावेळी पुरुस एकेरीतील पहिल्या फेरीतील सामन्यात किदंबी श्रीकांतने आपला पारंपारीक प्रतिस्पर्धी लुकास कॉर्वीचा एकतर्फी पराभव करताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धदक मारली आहे. यावेळी सामन्याच्या पहिल्या गेम पासूनच श्रीकांतने लुकासवर दबाव टाकायला सुरुवात केली. लुकासची सर्व्हिस भेदताना श्रीकांतने त्याच्यावरील दबाव आणखिनच वाढवल्याने श्रीकांतने पहिला सेट 21-12 असा सहज आणि केवळ 15 मिनिटांच्या आतच आपल्यानावे केला. पहिला सेट गमावल्यानंतर लुकासने सामन्यात पुनरागमनाचा थोदा फार प्रतिकार करत प्रयत्न केला. मात्र, श्रीकांतने या सेट मध्ये देखिल त्याच्या वर वर्चस्व गाजवताना त्याच्यावर दबाव वाढवला. यावेळी श्रीकांतने पहिल्या सेट पेक्षा जास्त चांगला खेळ करताना दुसरा सेट 21-16 असा आपल्या नावे करताना दुसऱ्या फेरीत धडक मारली.
तर, दुसरीकडे भारताचा दुसरा आघाडीचा खेळाडू एच.एस.प्रनोयचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. त्याला जॉनेथन क्रिस्तीने 21-11, 21-14 असे केवळ 33 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत करत दुसरी फेरी गाठली.

सामन्याच्या पहिल्याच सर्व्हीस पासून प्रनोय दबावात खेळत असल्याचे जानवत होते. त्यामुळे त्याचा फायदा जॉनेथनने उचलताना त्याच्यावरील दबाव आणखीनच वाढवला. त्यामुळे प्रनोयला अपेक्षित खेळ करता आला नाही आणि त्याने पहिला सेट केवळ 15 मिनिटांमध्ये 21-11 अश्‍या फरकाने गमावला. तर, दुसऱ्या सेट मध्ये प्रनोयने प्रतिकाराच थोडा फार केलेला प्रयत्न जॉनेथनने परतावून लावताना दुसरा सेटही 21-14 अश्‍या फरकाने जिंकताना हा सामना केवळ 33 मिनिटांमध्ये आपल्या नावे केला.

तर, महिला एकेरीत पी.व्ही.सिंधूने आधीच दुसऱ्या फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताची आशा असलेल्या वैश्‍नवी सिक्‍कीरेड्डी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. वैश्‍नवीचा सामना यावेळी पोर्नापी चेचूवूंगशी झाला. यासामन्यात पोर्नापीने वैश्‍नवीचा केवळ 30 मिनितांमध्ये आणि दोन सेट मध्येच पराभव करताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धदक मारली. यावेली सामन्याच्या पहिल्याच सेट पासून पोर्नापीने वैश्‍नवीला दबावात ठेवले होते. त्यामुळे वैश्‍नवीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आणि तीने पहिला सेट 21-12 असा शज गमावला तर दुसऱ्यासेट मध्येही वैश्‍नवीला सामन्यात पुनरागमन करण्यात अपयश आले आणि तिने दुसरा सेटही 21-16 असा गमावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)