फुगेवाडीत टोळक्‍याची तरुणाला मारहाण

पिंपरी – ऍडव्हान्स पेमेंट न दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्‍यांनी एका तरुणाला दगडाने जबर मारहाण करत कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना फुगेवाडी येथील साई सर्व्हिस सेंटरमध्ये घडली.

रोहन राजेश आगेलू (वय-24, रा. बी/9, उषाकाल हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सनी भोई, सिध्दार्थ गायकवाड (दोघे रा. दापोडी) आणि त्यांच्या अनोळखी दोघा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍडव्हान्स पेमेंट दिला नाही सनी भोई, सिध्दार्थ गायकवाड व त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी मिळून बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास रोहन याला दगडाने जबर मारहाण केली. तसेच हवेत कोयता फिरवत फुगेवाडी येथील साई सर्व्हिस सेंटरमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)