‘फुक्रे रिटर्न्स’ 8 डिसेंबरला रिलीज होणार

2013 मध्ये धमाल उडवणाऱ्या ‘फुक्रे रिटर्न्स’ची रिलीजची तारीख निश्‍चित झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस 8 डिसेंबरला “फुक्रे रिटर्न्स’ रिलीज होणार आहे. या दुसऱ्या भागात रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, अली फजल, मनजोत सिंग हे पहिल्या भागातलेच कलाकार मुख्य रोलमध्ये असणार आहेत. “फुक्रे रिटर्न्स’ ची घोषणा गेल्यावर्षीच झाली होती. तेंव्हापासून त्याच्याबद्दलच्या अपेक्षा व्यक्‍त व्हायला लागल्या होत्या. “फुक्रे’च्या पहिल्या भागामध्ये कोणीही नावाजलेला ऍक्‍टर नव्हता. जेमतेम 5 कोटी रुपयांमध्ये तो तयार झाला होता. तरी तो बॉक्‍स ऑफिसवर हिट झाला होता. “फुक्रे’ने 36 कोटींच्या आसपास धंदा केला होता. तशीच अपेक्षा या दुसऱ्या भागाकडूनही व्यक्‍त होणे स्वाभाविकच आहे. “फुक्रे रिटर्न्स’च्या प्रसिद्ध झालेल्या पोस्टरवर एक साप इंग्रजी आठच्या आकड्यामध्ये स्वतःचीच शेपूट पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. त्यातूनच सिनेमा 8 (8 ) तारखेला रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. यावर्षी ऑगस्टपासून “फुक्रे रिटर्न्स’चे शूटिंग सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)