फी वाढीविरोधात दाद मागण्याचा पालकांना अधिकार 

– विधानसभेत विधेयकाला मंजूरी 

मुंबई – मनमानी करीत परस्पर शैक्षणिक शुल्कवाढ करणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांच्या दादागिरीला आता आळा बसणार आहे. संस्थाचालकांच्या मनमानी विरोधात राज्य सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. त्यानुसार फीवाढीविरोधात दाद मागण्याचा अधिकार आता पालकांना मिळाला आहे. याविरोधात 30 दिवसांत सरकारच्या कार्यकारी समितीसमोर दाद मागता येणार आहे. या तरतुदीनुसार जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत शैक्षणिक संस्थांना 15 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शैक्षणिक शुल्क आकारता येणार नाही.

-Ads-

शिक्षण संस्थांच्या अवास्तव शुल्कवाढीविरोधात पालकांकडून वारंवार आवाज उठवला जात होता. शाळा व्यवस्थापनाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात पालकांना अपील किंवा तक्रार दाखल करण्याची संधी दिली जात नव्हती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी व शिक्षण संस्थाचालकांच्या बाजारीपणाला आळा घालण्यासाठी तसेच शिक्षणाचा दर्जा सर्वोत्तम करण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला.

या पिळवणुकीविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार महाराष्ट्र शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयकाने दिला आहे. याविषयीच्या शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. या विधेयकानुसार मनमानी शुल्कवाढ झाल्यास सरकारच्या कार्यकारी समितीकडे दाद मागण्यात येणार आहे. कार्यकारी समितीने दिलेला निकाल मान्य नसेल तर त्याविरोधात विभागीय शुल्क नियामक समितीकडे 60 दिवसांत दाद मागता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)