‘फिल ब्राऊन’ एफसी पुणे सिटी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक

पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आपल्या संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षक पदी फिल ब्राऊन यांची निवड केली.
जवळजवळ दोन दशकांच्या व्यवस्थापकीय अनुभवासह, ब्राऊन हे ब्लॅकपूल, साउथइंड युनायटेड, प्रेस्टन नॉर्थ एंड, डर्बी काउंटी आणि हॉल सिटी यासारख्या प्रख्यात इंग्लिश फुटबॉल क्‍लबचे प्रमुख आहेत. एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, फिल यांचा इंग्लंडमध्ये एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड असून खेळण्याचा तसेच व्यवस्थापकाचा मोठा अनुभव त्यांना आहे. याचा संघाला निश्‍चितच फायदा होईल.

फिल ब्राऊन म्हणाले की, एफसी पुणे सिटी संघासाठी हा कठीण मौसम आहे. मात्र मी माझ्या कामगिरीबद्दल आशावादी आहे. पॉईंट टेबलवरून आपण संघच्या प्रतिभेचा अंदाज लावू शकत नाही. संघातील खेळाडूंची क्षमता रोमांचक आहे. संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि मी खरोखरच एफसी पुणे सिटीसह हंगामासाठी उत्सुक आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)