फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चोरलेली बॅग परत मिळवली

मुंबई : बिझनेसमन किरण मकवाना यांची कार बोरिवली पश्चिमेच्या आर एम भट रोडवर ट्रॅफिक सिग्नलला थांबली होती. त्यावेळी एकाने मकवाना यांच्या कारची काच ठोठावली. त्यांनी काच खाली केली असता, दुसऱ्याने कारच्या सीटवर असेलली पैशांची बॅग पळवली. त्यानंतर दोघेही पसार झाले.

यानंतर मकवाना गाडीतून उतरले आणि त्यांचा पाठलाग करु लागले. काही अंतर धावल्यानंतर चोरट्यांनी रिक्षात बसून पळ काढला. मग मकवाना यांनीही रिक्षात बसून त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली.अखेर मकवाना यांनी इतर नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने यासिन धोबीला पकडलं. पण धोबीचा सहकारी मात्र पळून गेला. दिलासादायक गोष्ट म्हणजे पैशांची बॅग धोबीसोबत असल्याने ते परत मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)