फिरत्या लोकअदालतमध्ये 273 दावे निकली

त्यापैकी 123 दाखलपूर्व, तर 150 प्रलंबित


शिवाजीनगर न्यायालयात शनिवारी 104 दाव्यात तडजोड


16 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात 11 ठिकाणी राबविण्यात आला उपक्रम

पुणे- पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यात अकरा ठिकाणी राबविण्यात आलेल्या फिरत्या लोकअदालतमध्ये (मोबाईल लोकअदालत) 273 दावे तडजोडीअंती मिटविण्यात आले आहे. जिल्ह्यात 16 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला होता. तडजोड केलेल्या दाव्यातील 123 दावे दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित 150 दावे प्रलंबित स्वरूपाचे होते. संपूर्ण लोकअदालतमध्ये 25 लाख 53 हजार 101 रुपयांची तडजोड झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली.
या लोकअदालतीमध्ये सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, कलम 138 धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात न्यायप्राधिकरण आणि मोटार वाहन कायद्यासंबंधीची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे विविध बॅंका, वित्तीय कंपन्या तसेच मोबाईल-दूरध्वनी कंपन्यांकडील दाखलपूर्व प्रकरणे,विविध शासकीय, निमशासकीय, पोलीस खात्याकडील दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवली होती. जुन्नर येथे 16 जून रोजी सर्वात प्रथम हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये प्रलंबित 11 आणि दाखलपूर्व 1 अशी 12 प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी केवळ एका दाखलपूर्व दाव्यात तडजोड झाली. तर दुसरी लोकअदालत 18 जुलै रोजी घोडेगाव येथे झाली. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रलंबित 22 दाव्यापैकी 3 दाव्यात तडजोड झाली. तर तिसरे, चौथी लोकअदालत फेल गेली. दोन्हीमध्ये एकही दावा निकाली निघाला नाही. खेड येथे 19 जुलै रोजी झालेल्या तिसऱ्या लोकअदालतमध्ये 42, तर वडगाव मावळ येथे 21 जुलै रोजी झालेल्या चौथ्या लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी 104 दावे ठेवण्यात आले होते. शिरूर येथे 24 जुलै रोजी झालेल्या पाचव्या लोकअदालतमध्ये 51 पैकी 5 दावे निकाली काढण्यात आले. तर सहावी लोकअदालत 26 जुलै रोजी दौंड येथे झाली. त्यामध्ये 40 पैकी 9 दावे निकाली काढण्यात आले. सातव्या इंदापूर येथील लोकअदालतमध्ये 191 पैकी 16 दाव्यात तडजोड झाली. आठव्या बारामती येथील लोकअदालतमध्ये 191 पैकी 16 दावे निकाली निघाले असून, ही लोकअदालत 31 जुलै रोजी झाली. नववी लोकअदालत 2 ऑगस्ट रोजी सासवड येथे झाली. त्यामध्ये 333 पैकी 15 दावे निकाली काढण्यात आले. त्यामध्ये 38 हजार 658 रुपयांची तडजोड झाली. शुक्रवारी (दि. 3 ऑगस्ट) भोर येथे लोकअदालत झाली. त्यामध्ये 588 पैकी 111 दावे निकाली काढण्यात आले. 12 लाख 33 हजार 343 रुपयांची तडजोड झाली. शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात लोकअदालत झाली. त्यामध्ये 362 दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 104 दाव्यात आणि 7 लाख 14 हजार रुपयांची तडजोड झाली. संपूर्ण लोकअलातमध्ये 1 हजार 803 पैकी 273 दावे निकाली काढण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)