फिरकीपटू खेळवण्याचा विचार केला नव्हता- कोहली

पर्थ: भारतीय संघाच्या पराभवा खापर चुकीच्या संघ निवडीवर फोडले जात असताना विराट कोहलीने चार जलदगती खेळाडूंसह खेळण्याच्या त्याच्या निर्णयाची पाठराखण केली. पर्थ कसोटीमध्ये एकही स्पेशेलिस्ट फिरकीपटू न खेळवल्याचा त्याला कोणताही पश्‍चाताप नसल्याचे त्याने कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पुढे बोलताना विराट म्हणाला, मैदान पाहिल्यावर माझ्या मनात कधीच आले नाही की, या मैदानावरफिरकीपटू खेळवायला हवा. मी रवींद्रला जडेजाला पर्याय म्हणून पहिले नाही. चार जलदगती गोलंदाज खेळवणे फायद्याचे ठरेल असा मजा अंदाज होता. विरोधी संघातील फिरकीपटू नॅथन लायनने खूपच चांगली गोलंदाजी केली. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले इतर मी फिरकीपटूंचा विचार केला नव्हता. या सामन्यात 123 धावा करून देखील भारतीय संघाला विजया मिळवता आला नाही त्यामुळे या खेळीला मी जास्त महत्व देत नाही. कारण जर तुम्हाला जो निकाल हवा असेल तो जर तुम्ही मिळवू शकला नाहीत तर तुमची कोणतीही खेळी व्यर्थच आहे. मी सध्या पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करीत आहे, असेही विराटने यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चार जलदगती गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीती विषयी संघटन कोहली म्हणाला, मागील काही दौर्यात देखील आम्ही चार जलदगती गोलंदाजांसह खेळण्याचा प्रयोग केला हता. त्यावेळीदेखील इच्छित निकाल आम्हाला मिळाले नव्हता. परंतु, या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही ज्याप्रकारे रणनीती बनवली होती त्याचे 95 टक्के आमच्या काहेलात उतरवण्यात यशश्वी झालो. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजाने आम्हाला सतावले. पण दुसऱ्या डावात त्याचा आमच्यासमोर निभाव लागला नाही. विशेषतः मोहंमद शमीने चांगली गोलंदाजी केली.

सांघीक खेळाचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया संघाने आमच्यापेक्षा सरस खेळ केला. खासकरून त्याने पहिल्या डावात केलीली फलंदाज आमच्यासाठी डोकेदुखी ठरत होती. त्याने 330 धावांपर्यन्त मजल मालकी तेव्हाच मानसिकरीत्या या सामन्यात वरचढ झाले होते. आमही गोलंदाजीपेक्षा फलंदाजीमध्ये कमीपडलो. ऑस्ट्रेलियाने खेळाच्या सर्व आघाड्यावर बाजे मारल्याने ते विजयाचे हकदार होते आणि त्याचा विजय झाला असेही कोहलीने सांगितले.

मैदानावर हिरवळ असतानादेखील भुवनेश्वर कुमार ऐवजी उमेशला संघात स्थान देण्याबाबद विराट म्हाला, भुवनेश्वर कुमारने मागील काही काळात कमी कसोटी सामने खेळले आहेत. त्यात मनेशने वेस्ट इंडिजच्या घरच्या मालीकेत एका कसोटीमध्ये 10 बळी मिळवले होते. तो चांगल्या लयीत होता. म्हणून त्याची संघात निवड केली. एक जलदगती गोलंदाज जास्त खेळवायचा की आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला संघात स्थान द्यायचेहा देखील मोठा मुद्दा होता. कारण ते दोघे फलंदाजीमध्ये देखील संघासाठी चांगली कामगिरी करू शकले असते. परंतु, मैदानाची स्थिती बघून अतिरिक्त गोलंदाज खेळवणे मला योग्य वाटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)