फिरंगाई देवीच्या उत्सवाला सुरुवात

सांगवी – दापोडीचे ग्रामदैवत फिरंगाई देवीच्या उत्सवाला आज दापोडी येथे सुरुवात झाली. दरम्यान, या देवीचे मुळ कुरकुंभ या गावी असून, बुधवारी पहाटे ४ वाजता श्री फिरंगाई देवीची महापूजा करण्यात आली.

बुधवारी दिवसभर फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम झाला. देवीच्या पालखीचे प्रस्थान संध्याकाळी कुरकुंभ येथे पालखीच्या मानकऱ्यासह झाले.

आज (गुरुवारी) महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दापोडी येथे फिरंगाई देवीची महापुजा करण्यात येणार आहे. महापुजेनंतर श्रींचा पालखी छबिना निघणार आहे. तसेच उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचा आखाडा शुक्रवारी रंगणार आहे. यामध्ये महिलांच्या कुस्त्यांचे मुख्य आकर्षण असणार आहे. यावेळी भारत केसरी योगेश बोंबाळे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी बाला रफीक यांच्या कुस्त्यांचे आकर्षण राहील. कुस्तीगिरांना 11 लाख रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच नगरसेवक रोहित काटे यांच्या तर्फे चांदीची गदा देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
11 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)