फिफा विश्‍वचषक : विजयी सलामीसाठी मोरोक्‍को व इराण सज्ज 

सेंट पीटर्सबर्ग – फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यांपैकी आज रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्यात मोरोक्‍कोसमोर इराणचे आव्हान असणार आहे. इराण आणि मोरोक्‍को हे दोन संघ पहिल्यांदाच विश्‍वचषकात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी दोघांमध्ये केवळ एकच सामना झालेला असून तो सामना अनिर्णित राहिला होता. आता सलामीला विजय मिळविण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

या सामन्याला वादाची पार्श्‍वभूमी निर्माण झाली होती. कारण नाइके या स्पोर्टस शूज उत्पादक कंपनीने इराणच्या संघाला बूट देणार नसल्याचे सांगत त्यांना बुटांचा पुरवठा केला नव्हता. त्यामुळे संघातील खेळाडूंना ऐनवेळी स्थानिक दुकानांमधून बूट खरेदी करावी लागली होती. यावेळी इराणचे प्रशिक्षक कार्लोस कॉइरोज म्हणाले की, या घटनेमुळे आमचा संघ आणि खेळाडूंमधील संघभावना मजबूत झाली असून त्याचा फायदा आम्हाला विश्‍वचषक स्पर्धेत होणार आहे. या अनावश्‍यक वादाबद्दल नाइकेने आमच्या खेळाडूंची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ब गटातील या सामन्यात मोरोक्‍कोपेक्षा इराणच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे. इराणला सराव सामन्यांच्या वेळी अणेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ग्रीस आणि कोसोव्हो विरुद्धचे सराव सामने रद्द झाल्यामुळे त्यांना सरावाची जास्त संधी मिळालेली नाही. यावेळी इराणचे प्रशिक्षक कार्लोस कॉइरोज म्हणाले की, आमच्या संघात मोरोक्‍कोच्या संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. मोरोक्‍को हा सातत्याने चांगली कामगिरी करणारा संघ आहे, हे मला माहिती आहे. मात्र त्यांना आमच्या संघाच्या क्षमतेबद्दल कल्पना नाही आणि आम्हाला त्याचाच जास्त फायदा होणार आहे.

मोरोक्‍कोचा संघ पाचव्यावेळी विश्‍वचषकासाठी पात्र ठरला आहे, मात्र एकाही वेळा मोरोक्‍कोला अव्वल 16 संघांत प्रवेश मिळवता आलेला नाही. तसेच गेल्या चारपैकी तीनवेळा ते साखळी फेरीतच बाहेर फेकले गेले होते. मोरोक्‍कोला विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या 13 सामन्यांपैकी फक्‍त 2 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे ज्यात त्यांना 7 सामन्यांत पराभवाची चव चाखावी लागली आहे तर 4 सामने अनिर्णीत राखण्यात त्यांना यश मिळाले आहे.

सामन्याची वेळ- रात्री 8.30 पासून 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)