फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा सराव सामने : बेल्जियमचा कोस्टा रिकावर दणदणीत विजय 

रोमेलू लुकाकू व एडेन हॅझार्ड यांची चमकदार कामगिरी 

ब्रुसेल्स – अग्रगण्य आघाडीवीर रोमेलू लुकाकू व एडेन हॅझार्ड यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कोस्टा रिका संघाचा दणदणीत पराभव करताना बेल्जियम संघाने बलाढ्य जर्मनीने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सराव फेरीत आकर्षक विजयाची नोंद केली. वर्चस्व सिद्ध करणाऱ्या या विजयामुळे दोन दिवसांवर आलेल्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी बेल्जियमच्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास निश्‍चितच उंचावणार आहे. प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज होत असलेल्या बेल्जियमच्या संघातील एकापेक्षा एक सरस अशा गुणवान खेळाडूंच्या कामगिरीसमोर कोस्टा रिका संघाची दाणादाण उडाली. त्यामुळेच बेल्जियमने हा सामना 4-1 असा जिंकला तेव्हा कोणालाच आश्‍चर्य वाटले नाही. रोमेलू लुकाकूने दोन गोल नोंदविताना बेल्जियमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच एडेन हॅझार्डने आपल्या कामगिरीतील सातत्याचे दर्शन घडविताना एक गोल करीत प्रतिस्पर्ध्यांना इशाराच दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु सामन्याच्या 70व्या मिनिटाला हॅझार्डने लंगडत मैदान सोडले, तेव्हा बेल्जियमच्या पाटीराख्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. कोस्टा रिकाच्या बचावपटूने मारलेल्या किकवर हॅझार्डचा पाय चांगलाच दुखावलेला दिसला. मात्र हॅझार्डची दुखापत चिंताजनक नसल्याचे सांगताना तो तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या सहकारी खेळाडूंनी दिला. हॅझार्ड हा अत्यंत कणखर खेळाडू असून त्याला अशा दुखापतींची सवय आहे, असे सांगून लुकाकू म्हणाला की, तो लवकरच यातून बाहेर पडेल आणि तंदुरुस्त होऊन मैदानात उतरेल. त्याआधी गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या पहिल्या सराव सामन्यात इजिप्तचा 3-0 असा धुव्वा उडविणाऱ्या बेल्जियमने आज कोस्टा रिकाविरुद्धच्या लढतीतही मध्यंतरालाच 2-0 अशी आघाडी घेतली होती. ड्राईज मेर्टेन्स आणि रोमेलू लुकाकू यांनी लक्ष्यवेध करीत बेल्जियमला आघाडीवर नेले होते. लुकाकूने उत्तरार्धातही एका अफलातून हेडरवर आपला दुसरा गोल करीत बेल्जियमला 3-0 असे आघाडीवर नेले. तसेच त्याने दिलेल्या अचूक पासवर मिशी बात्शुयीने बेल्जियमचा चौथा गोल केला. विश्‍वचषक स्पर्धेच्या जी गटांत असलेल्या बेल्जियमसमोर इंग्लंड, पनामा आणि ट्युनिशिया यांचे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)