फिफा विश्‍वचषक : इजिप्तसमोर आज उरुग्वेचे खडतर आव्हान 

दुखापतग्रस्त सलाहचा सहभाग अनिश्‍चित 

येकाटेरिनबर्ग – मोहम्मद सलाहच्या अफलातून कामगिरीमुळे फिफा विश्‍वचषक स्पर्धेत स्थान मिळालेल्या इजिप्तच्या संघाची आज उरुग्वेच्या संघासमोर कसोटी लागणार आहे. या सामन्यात सलाह खेळण्याची शक्‍यता कमी असल्याने इजिप्तच्या संघाला सलामीच्याच ल्ढतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इजिप्त हा एक फुटबॉलवेडा देश आहे. मात्र हाच संघ आता आपल्या कठीण काळातून जात आहे, आणि त्याचे कारण ठरला आहे, तो म्हणजे मोहम्मद सलाह. सलाह दुखापतग्रस्त असल्या कारणाने इजिप्त मधील फुटबॉलचे चाहते सध्या सलाइनवर असून विश्‍वचषकातील संघाची मदार सलाहच्या कामगिरीवर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात सलाहला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळं त्याच्या विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आठवड्याभरातच मोहम्मद सलाह विश्वचषकात सहभागी होणार यावर शिकक्‍कामोर्तब करण्यात आले. पण सलाह पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. सलाह संघाच्या सराव सत्रात सहभागी झाल्यानंतर इजिप्तच्या सर्व चाहत्यांमध्ये एकच उत्साह संचारला होता. मात्र या सत्रात त्याने केवळ हलका सराव करण्यावर भर दिला होता. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबात जास्त अंदाज लावता आलानाही. तसेच त्याच्या खेळण्याबद्दलही प्रश्‍न निर्माण केला जाऊ शकतो.

इजिप्त आणि उरुग्वे यांच्यात यापूर्वी ऑगस्ट 2006 मध्ये एक सामना झाला असून त्या सामन्यात उरुग्वेने इजिप्तला 2-0 असे पराभूत केले होते. इजिप्तचा संघ विश्‍वचषक स्पर्धेसाठी केवळ तीनवेळा पात्र ठरला असून अखेरचा सामना त्यांनी 1990च्या विश्‍वचषक स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्यांना इंग्लंडच्या संघाकडून 1-0 असे पराभूत व्हावे लागले होते. आफ्रिकेमधील विश्‍वचषक स्पर्धेत उरुग्वेचा संघ तीन सामने खेळला होता. त्यात त्यांनी एक विजय मिळवला होता, तर दोन सामने त्यांनी बरोबरीत सोडविले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात इजिप्तच्या संघाची सर्व मदार सलाहच्या खेळण्यावर अवलंबून असणार आहे.

लिव्हरपूल संघाकडून खेळणारा अव्वल आघाडीवीर मोहम्मद सलाह दुखापतग्रस्त असून अजूनही वैद्यकीय उपचार घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत रिअल माद्रिदचा कर्णधार सर्जिओ रॅमोसने धडक दिल्यामुळे सलाहचा खांदा दुखावला होता. वेदनांनी विव्हळत असलेल्या सलाहला स्ट्रेचरवरूनच मैदानाबाहेर न्यावे लागले होते. सलाह किमान तीन आठवडे खेळू शकणार नसल्याचे इजिप्त फुटबॉल संघटनेनेही जाहीर केले होते. परंतु त्याचा संघात समावेश करून इजिप्तने कडवी झुंज देण्याचा इरादा जाहीर केला आहे. उरुग्वेविरुद्धच्या लढतीला सलाह मुकण्याची शक्‍यता असली, तरी 19 जून रोजी रशियाविरुद्ध आणि 25 जून रोजी सौदी अरेबियाविरुद्धच्या लढतीत तो खेळू शकेल, असे इजिप्त संघाने म्हटले आहे.

इजिप्त संघ– गोलरक्षक- एस्साम एल हैदरी, टावोऊन, महंमद एल शेनावी व शेरीफ एक्रमी, बचावपटू- अहमद फाथी, साद समिर, आयमान अशरफ, अहमद हेगाझी, अली गब्र, अहमद एल्मोहेमाडी, मोहम्मद एब्देल-शफी, ओमर गेबर व महमूद हमडी, मध्यरक्षक- मोहम्मद एलनेनी, तारेक हमीद, सॅम मोर्सी, महमूद अब्देल रझाक, अब्दल्लाह एल सैद, महमूद हसन, रमादान सोभी, अम्र वारदा व महमूद अब्देल मोनीम, आघाडीवीर- मोहम्मद सलाह व मरवान मोहसीन.

सामन्याची वेळ – संध्याकाळी 5.30 वाजता 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)