फिफा विश्वचषक : नेमारच्या ‘फॉल’वर बारची खास ऑफर 

रिओ डी जानिरो – फुटबॉल जगतात ब्राझिलच्या संघाला प्रचंड लोकप्रियता प्राप्त आहे. अशा या संघातील नेमार या अव्वल आक्रमकावर चाहत्यांच्या नजरा आहेत. मुख्य म्हणजे नेमारच्या खेळाची शैली आणि त्याचा मैदानावरील अंदाज पाहता रिओ डी जानिरो येथील एका बारने धमाल ऑफर देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. बुधवारी सर्बिया या संघाविरुद्ध ब्राझिलची लढत होत आहे. या सामन्यात नेमार जितक्‍या वेळी खाली पडेल, तितक्‍या वेळी या बारकडून ग्राहकांना मद्याचे शॉट्‌स मोफत देण्यात येणार आहेत. उत्तर रिओमध्ये असणाऱ्या सर वॉल्टर पबने त्यांच्या फेसबुक पेजवरून याविषयीची माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे नेमारच्या नावे दिली जाणारी ही सवलत म्हणजे एक प्रकारचे सुरेख प्रसिद्धी तंत्र असल्याचे म्हटले जात आहे.

नेमारचा खेळ पाहता त्याला सामन्यादरम्यान विरोधी संघातील खेळाडूंचा प्रचंड घेराव असतो. त्यामुळे त्याच्या खेळातही अडचणी येत आहेत. त्यामुळेच मग तो मैदानात वारंवार मोठ्या शिताफीने खाली पडताना आपल्या संघाला पेनल्टी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असतो. अर्थात हा खेळाचच एक भाग आहे. पण, त्याच्या या पडण्याचा असा फायदा करून घेणाऱ्या पबचीही सध्या क्रीडाविश्वात चर्चा आहे, हे नाकारता येणार नाही. यापूर्वी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये नेमार ज्या प्रकारे अनेकदा जाणूनबुजून पडत होता, ते पाहता त्याच्या खेळाची किंवा शैलीची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली. कोस्टा रिका विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने नाट्यमयरीत्या एक पेनल्टी मिळवली होती. पण त्याने खाली पडल्याचा प्रसंग अतिरंजित केल्याचा आरोपही झाल्याचे पाहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)