फिफा विश्वचषक : गतविजेत्या जर्मनीचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात

कझान अरेना -दक्षिण कोरियाने अखेरच्या एफ गटसाखळी लढतीत गतविजेत्या जर्मनीचा 2-0 असा पराभव करताना फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद केली. या पराभवामुळे गतविजेत्या जर्मनीचे आव्हान गटसाखळीतच संपुष्टात आले आहे.

निर्धारित 90 मिनिटांअखेर गोलशून्य बरोबरीनंतर यंग ग्वोन किमने 92व्या मिनिटाला, तर हेयुंग मिन सोनने 96व्या मिनिटाला गोल नोंदविताना कोरियाला विजय मिळवून दिला. एफ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात स्वीडनने मेक्‍सिकोचा प्रतिकार 3-0 असा मोडून काढताना पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत धडक मारली. तसेच मेक्‍सिकोनेही 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरी गाठली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीनंतर लुडविग ऑगस्टिन्सने व्हिक्‍टर क्‍लासेनच्या पासवर 50व्या मिनिटाला स्वीडनचे खाते उघडले. त्यानंतर 65व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर अँड्रियास ग्रॅनक्‍विस्टने स्वीडनला 2-0 असे आघाडीवर नेले. मेक्‍सिकोच्या एडसन अल्वारेझने 74व्या मिनिटाला नोंदविलेल्या सेल्फ गोलमुळे स्वीडनच्या 3-0 अशा विजयाची निश्‍चिती झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)