फिनआयक्यू ने जिंकली पुणेरी पलटणची ‘बोलकब्बडी कॉर्पोरेट चॅलेंज’ स्पर्धा

. फिनिक्स मार्केट सिटी मॉल मध्ये आयोजित या स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला

· फिनआयक्यू,कॅपजेमिनी, किर्लोस्कर, कोटक,टीसीएस आणि टेक महिंद्रा, या सारख्या आघाडीच्या कॉर्पोरेट कपंन्यांतील संघाचा सहभाग

-Ads-

· विजेत्या संघाचा सन्मान पुणेरी पलटणचा संघनायक गिरीश एर्नाक, जी बी मोरे आणि अक्षय जाधव यांच्या हस्ते

  • पुणे: पुणेरी पलटण तर्फे, कॉर्पोरेट संस्थामध्ये क्रीडा संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी फिनिक्स मार्केट सिटी मॉल येथे कॉर्पोरेट चॅलेंजचे आयोजन करण्यात आले. फिनआयक्यु तर्फे प्रायोजित ‘पुणेरी पलटण बोल कब्बडी कॉर्पोरेट चॅलेंज’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन पुणेरी पलटण तर्फे कब्बडीचा प्रचार आणि प्रसार समाजाच्या सर्व स्तरामध्ये व्हावा या साठी केले गेले होते.

कॉर्पोरेट क्षेत्रातील आठ संघानी या स्पर्धेत भाग घेतला. फिनआयक्यु आणि टेक महिंद्रा तर्फे फिनआयक्यु (अ) आणि फिनआयक्यु (ब) तसेच टेक महिंद्रा (अ) आणि टेक महिंद्रा (ब) असे प्रत्येकी दोन संघ सहभागी झाले होते. हे सर्व संघ अशा प्रकारच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असल्याने वातावरणात कमालीचा उत्साह भरला होता.

या स्पर्धेचा अंतिम सामना फिनआयक्यु (अ) आणि टेक महिंद्रा (अ) यांच्यात खेळला गेला, ज्यात फिनआयक्यु (अ) संघ ४०-३५ अशा गुण संख्येने विजयी ठरला. गिरीश एर्नाक, जी बी मोरे आणि अक्षय जाधव या पुणेरी पलटण संघातील खेळाडूंनी विजेत्यांना पदके प्रदान करून सन्मानित केले. या स्पर्धेसाठी कब्बडी खेळाडूंनी दाखवलेल्या उत्साहाचे कौतुक करत, यापुढेही कब्बडी सातत्याने खेळली जावी असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

यावेळी बोलताना, पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कैलाश कांडपाल म्हणाले, “कब्बडी हा एक मजेशीर खेळ आहे, जो गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढला असून, भारतातील त्याचे भविष्य उज्वल आहे. अशा प्रकारच्यास्पर्धेचे आयोजन करून, आम्ही देशात अशा संस्कृतीची जोपासना करत आहोत, की त्यातुन कब्बडी शौकिनांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. कॉर्पोरेट चॅलेंज साठी मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही अत्यानंदित झालो असून कॉर्पोरेट तर्फे या खेळाचे स्वागत तसेच स्वीकार होताना पाहून, खूप बरे वाटले. यातून हेच सिद्ध होते कि ग्रामीण तसेच शहरी भागांत हा खेळ तितकाच प्रसिद्ध आहे. भविष्यात आम्ही अशा स्पर्धेचे सातत्याने आयोजन करू की ज्यातून देशात कब्बडीची वाढ होईल.”

फिनआयक्यु या पुणेरी पलटण बोल कब्बडी कॉर्पोरेट चॅलेंजच्या सह-भागीदार कंपनीचे सीओओ, श्री उदय ओक, म्हणाले, “कब्बडी हा बुद्दीबळाप्रमाणेच एक स्वदेशी खेळ आहे. या खेळात साधेपणा आणि कमालीचा उत्साह असल्याने खेळाडू आणि प्रेक्षक एकसारखेच गुंतून जातात. या खेळात प्रेक्षकांना गुंगवून ठेवण्यासाठी यातील खेळाडूच पुरेसे असून कुठल्याही प्रकारचे क्रीडा साहित्य गरजेचे नसते. अनेक अडचणींना मात देत झपाट्याने वाढत चाललेल्या या खेळात सहभागी होण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असू.”

या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि अधिक अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रेक्षकांना कब्बडीतील काही रोमांचक क्षण अनुभवता आले आणि ते त्यांचा आवडीच्या संघांना सतत प्रोत्साहित करत होते.

विवो प्रो कब्बडी लीगचे सहावा हंगाम ७ ऑकटोबर पासून चेन्नई मध्ये सुरु होत आहे. पुणेरी पलटणचे शिव छत्रपती क्रीडानगरी,महाळुंगे बालेवाडी येथील सामने १८ ते २४ ऑकटोबर दरम्यान पाहायला मिळणार

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)