फिटनेसअभावी वाहनचालकांचे नुकसान

आरटीओसमोर संघटनांचे आंदोलन

पुणे – शहरात परिवहन संवंर्गातील वाहनांची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त असून या वाहनांना दरवर्षी फिटनेस सर्टिफीकेट बंधनकारक आहे. मात्र, सद्यस्थितीत आरटीओतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्टिफिकेट मिळण्यास मर्यादा येत असून तब्बल दोन महिने वाट पाहावी लागते. या कालावधीत वाहनचालकाचे आर्थिक नुकसान होत असल्याने लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून यावर तोडगा काढावा, या मागणीसाठी शहरातील वाहतूक संघटनांकडून आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदोलनात राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे बाबा शिंदे, प्रकाश जगताप, अशोक सालेकर, चंद्रकांत हरपळे आदी सहभागी झाले होते. सद्यस्थितीत शहरात 1 लाख 80 हजार परिवहन संवंर्गातील वाहने आहेत. वाहनांची संख्या पाहाता दिवसाला 660 वाहनांची फिटनेस तपासणी अपेक्षित आहे. मात्र, सद्यस्थितीत अपुऱ्या मोटार वाहन निरीक्षकांमुळे दिवसाला 300 ते 350 वाहनांचे पासिंग केले जाते. परिणामी, दरमहा सुमारे 12 हजार वाहने विनापासिंग थांबले जात असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. यामुळे आरटीओ प्रशासनाने लवकरात लवकर वाहनांच्या तुलनेत मोटार वाहन निरीक्षक उपलब्ध करून द्यावेत अन्यथा येत्या काळात झेंडेवाडी येथील पासिंग ट्रकवर कामकाज बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

…तर 14 हजार दंड
पासिंगसाठी अपॉंईंटमेंट मिळवण्यासाठी महिना ते दीड महिना वेळ जात असून या काळात वाहनचालकांना वाहने रस्त्यावर आणता येत नाहीत. रस्त्यावर वाहने आणल्यास आणि तपासादरम्यान ते पकडले गेल्यास मालकाला 14 हजार दंड भरावा लागतो. यामुळे अशा दुहेरी संकटात वाहनधारक सापडला असून यावर तत्काळ तोडगा काढण्याची गरज संघटनेने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)