विद्यापीठ अनुदान आयोगाची माहिती
पुणे- विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार फिजिओथेरिपीचे शिक्षण घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांना योग अभ्यासातील पदविका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता एक वर्षाची योग अभ्यासातील पदविका घेतल्यानंतरच फिजिओथेरिपिस्टसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एका वर्षाचा अभ्यासक्रम आणखी वाढल्याचे दिसत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबाबत निर्णय घेण्यासाठी एका समितीचे गठन केले होते. ही समिती योग अभ्यासात पदविका असणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरिपी करणे कितपत शक्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी नेमली होती. त्या समितीने दिलेल्या सूचनांनुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयायाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने म्हटल्याप्रमाणे, ज्या विद्यार्थ्यांनी योग अभ्यासात पदवी घेतली असेल त्यांना फिजिओथेरिपीमधील पदवीसाठी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. फिजिओथेरिपीसाठी आवश्यक गुण, किंवा पात्रता परीक्षेतील गुण हे योग अभ्यासाबरोबरच पात्रतेसाठी धरले जाणार आहेत. याबाबत आयोगाने महाविद्यालयांनाही सूचना दिल्या आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा