फिंचला सलामीला खेळण्याची संधी द्यावी – पॉन्टिंग

मेलबॉर्न: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटींग याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अँरॉन फिंचला सलामीला पाठवण्याचा सल्ला ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला दिला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसह पदार्पणास सज्ज असलेल्या मार्कस हॅरिस आणि अँरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करावी तर अन्य सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्याकडे तिसऱ्या क्रमांकावर देखील फलंदाजी करण्याची क्षमता आहे ,असे पॉंटींगचे मत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी- 20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यानंतर 6 डिसेंबरपासून चार कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉंटीगने याबाबत ऑस्ट्रेलियात क्रिकेट.कॉम.एयुला एक प्रदीर्घ मुलाखत देत चर्चा केली. यावेळी तो म्हणाला, ऑस्ट्रेलिया टी – 20 संघाचा कर्णधार अँरॉन फिंच याला ऑस्ट्रेल्याने सलामीला पाठवले पाहिजे. फिंच हा जागतिक स्तरावर एक यशस्वी सलामी फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो अनेक टी-20 लीमध्ये खेळताना त्याने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. फिंच हा आक्रमक खेळी करणारा फलंदाज आहे. फिंचच्या नैसर्गीक गुणवत्तेचा जर ऑस्ट्रेलियन संघाला अधिक फायदा करून घ्यायचा असेल तर त्याला सलामीला पाठवणे जास्त योग्य ठरेल. त्याच्याकडे एकहाती सामना फिरवण्याची गुणवत्ता असल्याने त्याला आक्रमक खेळ करण्याची मुभा दिली पाहिजे. मला विश्वास आहे की तो सलामीला खेळण्याच्या आपल्या अनुभवाच्या जोरावर कसोटीमध्ये देखील चांगली कामगिरी करून दाखवू शकतो.

ऑस्ट्रेलियाचा मार्कस हॅरिस स्थानिक स्पर्धेत सद्या चांगलाच भरात आहे. त्याने खेळलेल्या 4 सामन्यात 437 धावा केल्या होत्या. त्यातही त्याची सरासरी 87 इतकी अधिक होती. त्यामुळे हॅरिस हा सलामीला फिंचचा जोडीदार असावा असा पॉन्टिंगचा आग्रह आहे. मला आठवते, जेव्हा मी हॅरिसचा खेळ प्रथम पहिला होता तेव्हा त्यांच्यातील कौशल्य आणि प्रगल्भता पाहून हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची प्रतिभा असलेला खेळाडूला आहे असे वाटले होते. परंतु, सुरुवातीला त्याला स्थानिक क्रिकमध्ये काही माठी कामगिरी करता आली नव्हती परंतु, जेव्हापासून तो विक्‍टोरिया संघाशी जोडला गेला त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. त्याच्याखेरीज अन्य कोणत्याही फलंदाजाने स्तहनिक क्रिकेटमधे इतका मोठा दबदबा निर्माण केलेला नाही. त्यामुळे त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाले पाहिजे.

ऑस्ट्रेलियन माजी खेळाडूंमध्येच हमरीतुमरी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्‍लार्क याने ऑस्ट्रेलियन संघाला भरता विरुद्धच्या कसोटीमालिकेत अन्य गोष्टींकडे लक्ष्य न देता आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू हे त्यांच्या मैदानावरील आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. ते विरोधी खेळाडूला आक्रमक बोलून त्याची एकाग्रता भंग करण्यास भाग पडून सामन्याचे पारडे आपल्या बाजूला फिरवण्यात माहीर आहेत. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर आपली डागाळलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील तो आक्रमकपणा कमी झाला आहे. प्रतिमा सुधारण्यापेक्षा जर आक्रमक खेळ केला तर सामने जिंकाल अणे तुम्हाला आदर मिळेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही एक सामनाही जिंकू शकणार नाही, असे क्‍लार्क म्हणाला होता. या विधानांवरून नवीनच वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू क्‍लार्कवर टीका करत उडी घेत आहेत.

माजी खेळाडू सायमन कॅटीचने क्‍लार्क च्या विधानांवर टीका करत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीवर परखड मत मांडले आहे. कॅटीच म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून अश्‍याच प्रकारच्या आक्रमक आणि विरोधी खेळाडूंचा सन्मान न करण्याच्या वृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाला क्रिकेट विश्वात नापसंत केले जाते. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याच्यावृत्तीमुळे चेंडू छेडछाड प्रकरण घडले आणि ऑस्ट्रेलियाचे नाव जगभरात डागाळले आहे. ती प्रतिमा सुधारण्यासाठी सभ्यतेनेच खेळ करावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा संघ हा खेळाच्या विभागात अजूनही ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक पद्धतीनेच खेळत आहे. परंतु, नियमांचे पालन करत सामना जिंकण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जायचे याची सीमा आखली गेली पाहिजे. जेणेकरून पुन्हा चेंडू छेडछाड प्रकरणासारखी परिस्थिती ओढवणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)