फार लवकर गेलीस कविता….

कविता महाजन यांच्या लिखाणावर मनापासून प्रेम केले ते आजच्या युवा पिढीच्या अनेक सशक्त प्रतिनिधींनी. लिहिण्यातला बोल्डपणाच नव्हे, तर त्यामधला पाण्यासारखा पारदर्शीपणा या पिढीला लुभावणाराच ठरला. अशाच एका “कुहू’फेनचे हे मनोगत…

कविताची (महाजन) ओळख फेसबुकवरचीच. इथे तिच्या पोस्ट्‌स वाचून मग वाचनालयातून ब्र आणि भिन्न आणून वाचले. त्यात नव्याने कविता भेटली. परत इथे वाचत राहिले. एक दोनदा भेटले. मी फेसबुकातली मोगली आहे, असे मला वाटायला लागले आहे. उटपटांग गोष्टी करते. मुद्‌द्‌यावर कोणालाही गुद्दे घालते! पण खरे तर, मुद्‌द्‌यापुरतेच ते असते. त्यात अनेक लोक कळत नकळत दुखावले जाऊ शकतात. पिढीचा फरक असतो. त्यात काय इतके यार, माझा मुद्दा बरोबर आहे, प्रश्नच तर विचारलाय असे वाटत असते. पण कविता ह्यातल्या खाचाखोचा छान समजावून सांगते.

लिखाण, व्यक्त होणे हे कविताचे रिीीळेप असल्याने नव्याने काही मांडू पाहणाऱ्या मुलींना, मुलांना कायमच तिने एक्‍सटेंडेड समजून घेतले आहे. नेमके काय चुकतेय, काय बलस्थाने आहेत, कुठे कसे व्यक्त व्हावे ह्याची तिची निरिक्षणे असतात. जसे कौतुक करते, तसे चूकही सहजच आणि स्पष्टपणे सांगते.

-Ads-

“ड्रायव्हर बाई माणसाच्या रोड डायरीतून…’ आणि काही कथा इथे लिहिल्या, लिहीत असते, तेंव्हाही कविताने त्यांच्या मर्यादा, सुधारणा स्पष्ट सांगितल्या होत्या. तिचा स्वतःचा कामाचा आवका प्रचंड आहे आणि वेळेचे नियोजन चोख असल्याने तिने स्वतःला कसे कसे ट्रेन केलेय, ते ऐकले तरी आपल्याला खूप टिप्स मिळतात. मी चार पाच वेळा आजवर तिच्याशी फोनवर बोलले आहे, गेल्या पाच, सात वर्षांत. हा आकडा तसा खूपच कमी आहे. पण ती जे सांगत असते, त्यावर बराच वेळ रवंथ करायला खूप कंटेंट ती सहजच देऊन जाते. व्यक्त होण्यातले बारकावे, त्याची खोली, विविध पैलू, अभ्यासाची जोड, एक बैठक, पेशन्स ह्या सगळ्यांचा छान आढावा ती मांडते. फिलॉसॉफीकल आधार तिच्याकडून मिळतो.

जगण्यातल्या वेगवेगळ्या आव्हानांचा वस्तुपाठ असतो तो. निदान त्या जरी गोष्टी आपण वेळीच टाळल्या, तरी सुलझा हुआ आदमी/औरत व्हायला नवे पैलू मिळतात. एकूणच नाती, माणसांचे स्वभाव, तुमचे वेगळेपण जपत क्षमता फुलविणे आणि ती एक कष्टाची टप्प्याटप्प्याची प्रोसेस आहे, थोड्याश्‍या कशाने हुरळून जाऊ नका आणि फुटकळात (म्हणजे उडत्या उडत्या पोस्ट्‌स टाकून)

स्वतःला सीमित करू नका, ह्या फार महत्वाच्या टिप्स ती नेहमीच देतांना दिसते. त्याबद्दल वेळोवेळी लिहितांना दिसते. एखादी गोष्ट आवडणे वेगळे आणि ती आवड गंभीरपणे जोपासत अधिकाधिक खोलात जाणे वेगळे. त्यासाठी प्रयत्न करणे, प्रयोग करणे, क्षमता लहरपपशश्रळूश करणे ह्या सगळ्यांची चालती बोलती प्रयोगशाळा आहे ती. कोणत्याही एक्‍सप्रेशनबद्दल अत्यंत गंभीर असलेली व्यक्तीच त्यात प्रयोग करू पाहणाऱ्यांना मोलाचे काही पोहोचवू शकते. शेवटी आपापल्या पिचवर आपल्यालाच खेळायचे असते. पण ज्यांनी तिथे आधीच वेगळे आणि ठोस काही केलेले आहे, त्यांची शिदोरी आपल्यालाही खूप काही देऊन जाते.

लेखनाबद्दल मला असे वाटते की मी जेंव्हा इतर कुठली कला शिकते, जसे की व्हायोलिन वाजवते आहे, तर त्याची काही लेव्हल पार केल्याशिवाय मी थेट व्हायोलिनचा कार्यक्रम करणार नाही. त्यावर काही काळ मेहनत घेतल्यावर ते मी सादर करेन. तसेच, केवळ व्यक्त होऊ शकतो, हवे ते शब्द आपल्याला जे मांडायचे आहे, त्यासाठी सुचतात आणि मांडणे नेमके पकडता येते शब्दांत, ह्या भांडवलावर त्यात धुडगूस नकोय घालायला. हे मुरले पाहिजे, अभ्यास वाढला पाहिजे, बऱ्यापैकी तयारी करून त्यात उतरले पाहिजे. परवाच हे एका मित्राला लिहून पाठवले. कविताने हेच सुचवले, जे मला पूर्णच मान्य आहे. त्याच वाटेवर चालले आहे.

एकाच कुणाला आदर्श मानणे आणि हुरळून जाणे, ह्या टप्प्यातून मी कधीच पलिकडे गेले आहे. पण तरीही कविताचे नॅरेशन मला फार दमदार आणि दिलदार देखील वाटते. आरपार, थेट आणि आतबाहेर एकच. वैयक्तिक संदर्भ पूर्ण गाळून/ लपवून/ सोडून आयुष्यावर चर्चासत्र घडवून आणणारे, जीवन सत्य सांगत आहोत असे बोलणारे, लिहिणारे मला विशेष अपील होत नाहीत. पण फेसबुकमध्ये आणि इतरत्रही स्वत:पासून ते जगापर्यंत आणि जगापासून स्वत:पर्यंत काहीही सहजच मांडणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. त्या लेखनात खूप मजेदार, दर्जेदार काही आहे. वेगळी दृष्टी आहे आणि थक्क करणारे बारकावे आहेत. कविता अशाच थेट आणि

दर्जेदार एक्‍सप्रेशनची खेळाडू वाटते मला. शिकता येईल तितके शिकावे ह्या माणसांकडून…

– प्राची पाठक

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)