फारुख अब्दुल्लांच्या वसाहतीत घुसखोरीचा प्रयत्न

जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
जम्मू – जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला राहत असलेल्या वसाहतीत एका व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. या अज्ञाताने बॅरिकेट तोडून कार थेट आतमध्ये घुसवली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी चालकावर गोळीबार केला. यात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत तरूणाच्या कुटुंबियांनी सुरक्षा रक्षकांविरोधात निदर्शने करत कारवाईची मागणी केली.

मुराद अली शाह असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो पुंछ येथील मेंढरचा रहिवाशी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेट तोडून घुसखोरीचा प्रयत्न करणा-या कार चालकावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यात गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ज्यानंतर त्याला जवळच्याच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

-Ads-

या घटनेचा विरोध दर्शवित तरूणाचे वडिल म्हणाले, माझा मुलगा रोज जीमला जात असतो. नेहमीप्रमाणे सकाळीही तो जीमला गेला होता. दरम्यान, जेव्हा त्याने गेट तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला अटक का केली नाही, असा सवाल केला.

या घटनेनंतर जम्मू-काश्‍मीर पोलिसांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बठिंडी भागात फारुख अब्दुल्ला यांच्याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे इतरही मोठे नेते राहतात. या भागात चौफेर कडेकोट बंदोबस्त असतो.

या घटनेवेळी फारुख अब्दुल्ला घरात नव्हते. फारुख अब्दुल्ला यांचे घर वसाहतीच्या उजव्या बाजूला आहे. या घटनेला सध्या दहशतवादी घटनेशी जोडता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. ही एक घटना असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची प्रत्येक दृष्टीकोनातून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिका-यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)