फायनान्स कंपनीच्या नावाने फसवणूक

9 लाख रुपये किंमतीच्या टेम्पोची लावली परस्पर विल्हेवाट
नगर, दि. 19 (प्रतिनिधी)- फायनान्स कंपनीकडून आल्याचे भासवून दोघांनी 9 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा सहा चाकी टेम्पो चोरुन नेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केली. ही घटना बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा येथे घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब गोरख शिंदे (रा. डी 103 आर्यन गार्डन, सुडके मळा बालिकाश्रम रोड) यांच्या घरी दिलीप शिवाजी दुसुंगे (रा. कापूरवाडी, ता. नगर) यांनी जाऊन मी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून आलो असल्याचे सांगून बाळासाहेब शिंदे यांचा टाटा कंपनीचा सहा चाकी 1109 मॉडेल असलेला एमएच 16 एई 9316 नंबरचा टेम्पोबाबत विचारणा केली आणि शिंदे यांचा 9 लाख रुपये किंमतीचा टेम्पो हप्त्याच्या अनियमितपणाच्या कारणावरुन ओढून चोरुन नेला.

या टेम्पोची त्याने सिद्धीविनायक फिटर (रा. कापूरवाडी) यांच्या मदतीने विल्हेवाट लावली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी बाळासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरुन दिलीप शिवाजी दुसुंगे व सिद्धीविनायक फिटर मालकावर भादंविक 420, 403, 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हिंगोळे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)