फातिमावर कतरिना नाराज

“ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये आमिर खानबरोबर असलेली कतरिना सध्या फातिमा सना शेखवर नाराज आहे. आमिर आणि अमिताभ बच्चन या बड्या कलाकारांच्या बरोबर फातिमा सना शेख ही देखील “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये आहे. कारण आमिर खान आणि फातिमा सना शेख यांच्यामधील जवळीक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही बाब आता कतरिनापासून लपून राहिलेली नाही.

“ठग्ज…’मध्ये कतरिना आणि फातिमा या दोघीही लीड रोलमध्ये आहेत. पण फातिमा आणि आमिरचे जूने कनेक्‍शन आहे. फातिमाने यापूर्वी “दंगल’मध्ये आमिरच्या मुलीचा रोल केला होता. “दंगल’ सुपरहिट झाला होता आणि कुस्तीच्या आखाड्यात उतरलेली फातिमाही प्रेक्षकांनी पसंत केली होती. “दंगल’साठीही फातिमाची निवड आमिरनेच केली होती. या सिनेमानंतर फातिमासाठी आमिर एक मेंटॉरच्याच भूमिकेत आहे. तो तिला मार्गदर्शन करतो आणि तिची शिफारसही करतो आहे. त्याने “ठग्ज..’मध्येही तिच्या निवडीसाठी आग्रह धरला होता, असे समजते आहे.

आता कतरिनाच्या बरोबर फातिमाला फुटेज मिळते आहे आणि आमिरचा अधिकचा सहवासही मिळतो आहे, या दुहेरी कारणांमुळे कतरिना थोडी अस्वस्थ झाली आहे. फातिमाचा वाढता प्रभाव पाहून तिला आपल्या रोलची चिंता लागली आहे. “धूम 3’मध्ये कतरिनाच्या रोलला ऐनवेळी कात्री लावली गेली होती. त्याचप्रमाणे “ठग्ज…’मध्येही आपल्या रोलला कात्री लागणार नाही ना, अशी तिची चिंता आहे. यशराज बॅनर आणि कतरिनाचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अशी भीती व्यर्थ आहे. पण आमिरच्या प्रभावामुळे काहीही होऊ शकते. म्हणून अस्वस्थ झालेल्या कतरिनाने प्रोड्युसर आदित्य चोप्राशी चर्चा केली. “तुझ्या रोलला कात्री लागणार नाही.’असे आश्‍वासन आदित्य चोप्राने तिला दिले आहे.
“ठग्ज…’मध्ये एक ड्रीम सिक्‍वेन्स आहे. त्यात आमिर फातिमाला कीस करतानाचा सीन आहे. त्याबाबतही कतरिनाला आक्षेप असल्याचे समजले होते. आता प्रोफेशनल असल्याची आपली इमेज कायम राखण्यासाठी आमिर काय करतो हे बघण्यासारखे आहे. काही झाले तरी कतरिना आणि फातिमामधील ही दरी कमी व्हायला हवी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)