फाटा क्र. 22 चे शेतकरी तुपाशी, 23 चे उपाशी

केडगाव परिसरात बेबी कालव्याच्या पाणी वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी

केडगाव- केडगाव परिसरातून वाहणाऱ्याफाटा क्रमांक बावीसवरील शेतकऱ्यांना मागील पंधरा दिवसांपासून दोनवेळा बेबी कालव्याचे पाणी मिळत असून, तेवीस क्रमांकाच्या फाट्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या तरी बेबी कालव्याच्या पाण्यामुळे बावीस फाट्यावर असणारे शेतकरी तुपाशी, तर तेवीस फाट्यावर असणारे उपाशी असे चित्र दिसुन येत आहे.
चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्याना कालव्याच्या पाण्याचाआधार वाटत आहे. अशात पाटबंधारे खात्याच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मुळा-मुठा उजवा कालवा भरून वाहत असताना केडगाव परिसरातील तेवीस फाट्यावर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून कालव्याच्य आवर्तनापासून वंचित राहावे लागत आहे. बेबी जुन्या कालव्याचे पाणी पंधरा दिवसांपासून दोनवेळा या कालव्याच्या परिसरातील शेतकरी बांधवाना मिळाले; परंतु तेवीस फाट्यावर असणारे शेतकरी या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • पाटबंधारे खात्याचे मौन
    याबाबत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी तोंडावर बोट ठेवणे पसंद केले. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. गहु, हरभरा लागवडीचा काळ असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची नितांत आवश्‍यकता आहे. विहिरीतील पाणी कमी झाले आहे; परंतु याबाबतीत कोणीही बोलायला तयार नाही.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)