फाकटे शाळेस ग्रामपंचायतमार्फत वॉटर फिल्टर

टाकळी हाजी – शिरूर तालुक्‍यातील फाकटे ग्रामपंचायत वित्त आयोगायचे माध्यमातून जि.प.शाळा फाकटे येथे ई-लर्निग संच आणि 25 लिटर वॉटर फिल्टर मशीन आणि संगणक लॅबसाठी निधी देण्याची तरतूद केली आहे. या शाळेमध्ये यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड, प्रोजेक्‍टर, पाच संगणक मिळाले आहेत. विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेत आहेत. संगणक तंत्रज्ञान स्वतः वापरण्याचे कौशल्या विद्यार्थी आत्मसात करत आहेत. त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी अधिक उपयोग झाल्याचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे आणि आरोग्य मिळावे म्हणून वॉटर फिल्टर तसेच ई-लर्निग माध्यमातून विद्यार्थी संख्येत वाढ होईल, असे सरपंच बारकू वाळूंज आणि उपसरपंच मनेष बोऱ्हाडे यांनी सांगितले. या शाळेत असलेल्या भौतिक सुविधा, गुणवत्ता आणि अनेक उपक्रम राबविल्याने शाळेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)