फाकटे येथे हरिनाम सप्ताह

टाकळी हाजी-फाकटे (ता. शिरूर) येथे श्रीराम नवमी यात्रेच्या निमित्ताने श्रीराम भजनी मंडळ व गणेश भजनी मंडळ यांचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या भागात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. या गावात श्रीरामाचे भव्य मंदिर असून येथील लोक हरिनाम सप्ताह व यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. पहाटे काकडा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व जागर केला जातो. हभप पोपटमहाराज राक्षे, मल्हारीमहाराज शेवाळे, सचिनमहाराज बेंडे, किरणमहाराज भागवत, पुरुषोत्तममहाराज पाटील, नवनाथमहाराज माशेरे, पारसमहाराज मुथा यांचे काल्याचे कीर्तन होईल. रविवारी (दि. 25) पालखी मिरवणूक होऊन सोमवारी कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम ठेवला आहे. यात्रेचे नियोजन समस्थ ग्रामस्थ व नवतरुण मुंबईकर मित्र मंडळ फाकटे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)