फाकटेमध्ये रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

टाकळी हाजी – फाकटे (ता. शिरूर) येथे श्रीराम नवमी यात्रेच्या निमित्ताने श्रीराम भजनी मंडळ व गणेश भजनी मंडळ यांचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या भागात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. या गावात श्रीरामाचे भव्य मंदिर असून येथील लोक हरिनाम सप्ताह व यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. पहाटे काकडा भजन,प्रवचन हरिपाठ, किर्तन व जागर केला जातो. हभप पोपट महाराज राक्षे, हभप मल्हारी महाराज शेवाळे, हभप सचिन महाराज बेंडे, हभप किरण महाराज भागवत, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप नवनाथ महाराज माशेरे, हभप पारस महाराज मुथा यांचे काल्याचे कीर्तन होईल. रविवारी (दि.25) पालखी मिरवणूक होवून (दि. 26) कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मूळे यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम ठेवला असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले. यात्रेचे नियोजन समस्थ ग्रामस्थ व नवतरुण मुंबईकर मित्र मंडळ फाकटे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)