फाकटेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेढ्या मृत्यूमुखी

टाकळी हाजी – फाकटे (ता. शिरूर) केदारी वस्ती येथे सोमवारी (दि.19) रात्री साडेतीनच्या सुमारास दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्‌यात तीन मेंढ्या फस्त केल्याची घटना घडली आहे. वनखात्याचे अधिकारी विठ्ठल भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केदारी वस्ती (पाटाजवळ) संतोष ज्ञानदेव पाटे हे आपल्या मेंढ्यांसह शेतात वास्तव्यास असताना. रात्री अचानक दोन बिबट्यांनी मेंढ्यांवर हल्ला केला. त्यात दोन मेंढ्या जागेवरच ठार झाल्या. त्यावेळी. कुटुंबीय जागे होताच आरडाओरडा करत व कुत्र्याचे भुंकण्याने बिबट्याने आणखी एक मेंढी घेवून तेथून पलायन केले. तीन मेंढ्या ठार झाल्याने व अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी प्रवीण क्षिरसागर व विठ्ठल भुजबळ यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केल्याचे सांगितले. या भागात बिबट्याचे हल्ले दिवसा देखील दिसणे हे मनुष्यालासुद्धा घातक ठरू शकते. वनविभागाने विविध ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सरपंच बारकु वाळुंज, उपसरपंच मनेष बोऱ्हाडे, पवन वाळुंज व गुलाब गावडे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)