फसव्या धोरणांमूळे राज्याची परिस्थीती खालावली: आ.चव्हाण

फलटण ( प्रतिनिधी ) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचा बोजवारा उडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करू, दोन कोटी नोकऱ्या देऊ अशा एक ना अनेक केंद्र सरकार व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक, परिस्थिती खालावली आहे. तसेच भारतात व महाराष्ट्रात महिला व मुलींवर सर्वात जास्त अत्याचार झाले आहे. राज्यातील हजारहून अधिक महिला व मुली बेपत्ता असल्याचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी येथे म.गांधी जयंती निमित्त आयोजित मौन आंदोलना दरम्यान सांगितले

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या फसव्या धोरणामुळे आर्थिक,सामाजिक,परिस्थिती खालावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणामुळे महात्मा गांधीजींनी आणि स्वातंत्र्यवीरांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य,लोकशाही, व संविधानिक सार्वभौमत्व धोक्‍यात आलेले आहे. भारतीय लोकशाही अबाधित रहावी यासाठी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी “राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी फलटण तालुका व शहर’ च्या वतीने महात्मा गांधी पुतळ्या जवळ मौन धारण करुन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. नीताताई नेवसे, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, युवक अध्यक्ष जयकुमार इंगळे, तालुकाध्यक्षा लतिका अनपट, शहराध्यक्षा मेघा सहस्त्रबुद्धे, पंचायत समितीच्या सभापती रेश्‍मा भोसले, सदस्या संगिता धुमाळ, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन ङॉ. बाळासाहेब शेंडे, दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, नगरसेवक अजय माळवे, असिफ मेटकरी नगरसेविका प्रगतीताई कापसे, वैशालीताई चोरमले, ज्योत्स्ना शिरतोडे, दत्तात्रय गुंजवटे, मुकूंदराव रणवरे, सिकंदर डांगे, वसंतराव गायकवाड, अमरसिंह खानविलकर तालुक्‍यातील शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला व युवक चे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)