फसव्या दाव्यांचा भूलभूलैया (भाग-२)

फसव्या दाव्यांचा भूलभूलैया (भाग-१)

काही दिवसांपूर्वीच लहान मुलांच्या टेल्कम पावडरमध्ये कर्करोगाचे तत्त्व आढळून आले तेव्हा बहुराष्ट्रीय कंपनीवर अब्जावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अनेक वर्षांपासून हे महागडे पावडर सुरक्षित समजून मुलांसाठी वापरले जात होते. ही घटना नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. यापुढील काळातही अशा घटना घडल्या तर आश्‍चर्य वाटायला नको. याशिवाय लठ्ठपणा कमी करणे, उंची वाढवणे, मेंदूची क्षमता वाढवणे, लैगिंक शक्ती वाढवणे अशा प्रकारचे दावे करत काही कंपन्या बाजारात शक्तिवर्धक औषधं आणत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर संशय निर्माण होण्याला जागा राहते. प्रचारतंत्राच्या आधारावर या कंपन्या नागरिकांवर प्रभाव पाडतात आणि नागरिकही भावनेच्या आहारी जाऊन महागडी उत्पादने खरेदी करतात. अगदी शिकलेला व्यक्ती एकदा तरी या कंपनीच्या भूलभूलैयात अडकल्याशिवाय राहात नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खाद्यपदार्थांबाबत विविध दावे करत येनकेन प्रकाराने आपले उत्पादनं ग्राहकांच्या गळी उतरवण्यासाठी कंपन्यांची सुरू असलेली स्पर्धा ही आरोग्यांच्या मुळावर उठली आहे. अशा वेळी खाद्यपदार्थावर वैधानिक इशाऱ्याचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते. अशा खाद्यपदार्थांची स्वत:च्या पातळीवर तपासणी करणे आरोग्य यंत्रणेला आवश्‍यक वाटत नाही का? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. परंतु खाद्य उत्पादक कंपन्यांबरोबरच सरकारी यंत्रणाना देखील नागरिकांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नसल्याचे सध्याच्या स्थितीवरून निदर्शनास येत आहे. त्यामुळे भ्रामक जाहीराती रोखण्यासाठी केवळ मोठमोठी आश्‍वासनं आपल्याला दिसून येतात. कायद्याची निर्मिती होते, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा त्याचे परिणाम प्रभावकारी ठरत नाहीत. तसे पाहिले तर फूड सप्लिमेंट आणि शुगर फ्रीचे उत्पादन विकणाऱ्या कंपन्यांचे मोठे जाळे असून त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. यापासून सामान्यांचा बचाव करायचा असेल तर गुणवत्ता आणि पौष्टिकतेचे दावे करणारे आणि ते सत्यात न आणणाऱ्या कंपनीविरुद्ध कडक कारवाई करणे हा एक उपाय मानता येईल.

– अपर्णा देवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)