फसवणूक प्रकरणात एकाला पोलीस कोठडी, तर महिलेला जामीन

पुणे – बनावट कागदपत्रांच्या आधारे डीसीबी बॅंकेची सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर महिला आरोपीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

निर्मल उदय डे (वय 33, रा. वडगाव धायरी, मुळ रा. वर्धमान, पश्‍चिम बंगाल) याला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर या प्रकरणातील आरोपी महिला सुदिपा वरूण डे (वय 29, रा. धायरी) यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी विलास बबन ढेबे (वय 36, रा. सनसिटी रस्ता, वडगाव) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. 20 फेब्रुवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वरूण उदय डे (रा. धायरी), सतिश आप्पाजी सावंत (वय 49, रा. शिवरकर रस्ता, वानवडी), विशाल दत्तात्रय जाधव, शकुंतला जाधव, पारस सुधीर शहा आणि प्रतिभा सुधीर शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी वरून डे यांचे निधन झाले आहे.

आरोपींनी गृहकर्जासाठी बनावट ताबा पत्र तयार करून ते डीसीसी बॅंकेत सादर केले. त्याद्वारे 2 कोटी 14 लाख 56 हजार 110 रुपयांचे कर्ज घेवून बॅंकेची फसवणूक केली. याप्रकरणी बचाव पक्षाच्या वतीने ऍड. बी. ए. आलूर, ऍड. रणजीत ढोंमसे-पाटील, ऍड. राज सावंत यांनी कामकाज पाहिले.

Remarks :


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)