फसवणूक त्यांच्या रक्तातच : मोदींची मध्यप्रदेशात कॉंग्रेसवर टीका 

छिंदवाडा: लोकांची फसवणूक करणे कॉंग्रेसच्या रक्तातच असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना केली. ते म्हणाले की आज मध्यप्रदेशाच्या निवडणूक जाहीरनाम्यात कॉंग्रेसने गोशाळा बांधण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण याच पक्षाच्या लोकांनी केरळात गोहत्या बंदी लागू केल्याच्या निषेधार्थ गायी मारून बीफ पार्टी केली होती अशी टीका त्यांनी केली.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की आमच्या पक्षाने तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी पैशाची लूट थांबवली असून आधार कार्डाचा वापर वाढवून आम्ही बोगस लाभार्थी मोठ्या प्रमाणात बाहेर काढले आहेत त्यामुळे सरकारी निधीची सुमारे 90 हजार कोटी रूपयांची लूट वाचली आहे. आधार कार्डाचा वापर केल्याने देशातील सहा कोटी लाभार्थी हुडकणे शक्‍य झाले आहे असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच कॉंग्रेस पक्ष आपल्या सरकारवर टीका करीत आहे असा दावाही त्यांनी केला.यावेळी मोदींनी छिंदवाडाचे खासदार आणि प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्यावरही सडकून टीका केली. त्यांनी केलेला विकासाचा दावा बोगस असल्याचेही ते म्हणाले. कमलनाथ यांची एक व्हीडिओ कॅसेट अलिकडेच व्हायरल झाली आहे त्यात त्यांनी चारित्र्यापेक्षा निवडून येण्याची क्षमता महत्वाची असल्याचे विधान केले होते. त्याचा संदर्भ देतही त्यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली.

-Ads-

सोनिया गांधींनी सीताराम केसरींवर केला अन्याय 
तत्पुर्वी छत्तीसगड मध्ये रायपुर येथेही त्यांची सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी नेहरू-गांधी परिवारवादावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की नेहरू गांधी घराण्याच्या बाहेरील ज्या व्यक्ती कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या त्यांना नेहमीच त्रास दिला गेला. सोनिया गांधींसाठी सीताराम केसरी यांनी पक्षाध्यक्षपदावरून हाकलून त्यांचा अवमान करण्यात आला असेही त्यांनी नमूद केले. नेहरूंमुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला या कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या विधानावरही त्यांनी यावेळी पुन्हा हल्ला चढवला. गांधी नेहरू घराण्याबाहेरील एका व्यक्तीला पाच वर्षासाठी कॉंग्रेसचे अध्यक्षपद तुम्ही देऊन दाखवा तरच तुमचा हा दावा मी मान्य करेन असे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)