फसवणुकी प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

इंदापूर – अज्ञान मुलीच्या नावे असणाऱ्या जमिनीची बेकायदा खरेदी करुन, तडजोडी प्रमाणे न वागता फसवणूक केल्याच्या आरोपावरुन नऊ जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हनुमंत रामहरी गमे,सुरेखा हनुमंत गमे, सागर हनुमंत गमे (सर्व रा. पानीव, ता.माळशिरस, जि.सोलापूर), विजय महादेव जाधव,ब ाळू माणिक भापकर, आबा अंबादास शिंदे, अंबादास जयवंत शिंदे, स्वप्निल अंबादास शिंदे (सर्व रा. सराफवाडी, ता.इंदापूर), संतोष मुकिंदा जाधव (रा.कळंब, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तर रवींद्र जनार्दन निंबाळकर (रा.निरवांगी, ता.इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, दि. 1 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी पावणेसात वाजता इंदापूर तहसील कार्यालयात आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीच्या ताबे वहिवाटीच्या निरवांगी येथील जमीन गट क्र. 551 च्या पूर्वेकडील 41 आर क्षेत्राचे दस्त क्र.470/2018 चा मालकी हक्क नसताना, फिर्यादीची अज्ञान भाची ऋतुजा शिवाजी गमे हिच्या नावावरील जमिनीची बेकायदा खरेदी केली. तर फिर्यादीच्या रे.मो.नं.45 /2011 मध्ये तडजोडीप्रमाणे न वागता आरोपींनी त्याची फसवणूक केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार ए. एम. काझी पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)