फसवणुकीप्रकरणी विजय कोलतेंची जामिनावर सुटका

सासवड- खोट्या सह्याकरून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांची 15 हजार रुपये रोख व काही अटी, शर्तीवर जमीन मंजूर करीत सुटका केली आहे.
पुरंदर तालुक्‍यातील पिसर्वे येथील दादासाहेब नामदेव कोलते, गंगाराम नामदेव कोलते यांच्या मालकीची गट नंबर 356 मिळकतीचे पूर्ण क्षेत्र 2 हेक्‍टर 12 आरपैकी 1 हेक्‍टर क्षेत्र जय मल्हार फळ भाजीपाला प्रक्रिया संस्था मर्यादित यांना दिले आहे. परंतु भूमिअभिलेख कार्यालयाकडून फाळणी बारा तयार करण्यासाठी जय मल्हार फळ प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी या जमिनीच्या मोजणी करण्याच्याकामी अर्जावर स्वतःचा फोटो लावून सही केली व सहहिस्सेदार व चतु:सिमा लगत असणार्या शेतकऱ्यांची मोजणीसाठी संमती आहे अशा समतीदर्शक खोट्या सह्या करून मोजणी करून घेतली. हे फिर्यादीस समजल्यावर त्यांनी मोजणी कार्यालयाडून माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. त्यात फिर्यादिच्या सह्या खोट्या असल्याची खात्री झाल्याने फिर्यादीने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावर कारवाई न झाल्याने सासवड येथील न्यायालयात फसवणुकीचा दावा दाखल केला होता हे प्रकरण न्यायालयाने चौकशीसाठी सासवड पोलीस ठाण्याकडे पाठविले होते. सासवड पोलीस ठाण्याकडून याची चौकशी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवून या सह्या खोट्या व बनावट असल्याचा अहवाल न्यायालयास पाठविला यावर न्यायालयाने दावा दाखल करून विजय विनायक कोलते यांना आरोपी म्हणून समन्स काढून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले . कोलते न्यायालयात हजर झाल्यावर न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपये रोख व फिर्यादी व फिर्यादीच्या साक्षीदारांवर दबाव आणणार नाही या अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहेत. तसेच शनिवारी (दि. 23) न्यायालयात हजर रहाण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)