फसवणुकीप्रकरणी पंतप्रधानांना पत्र पाठवणार

मंचर-पॅनकार्ड क्‍लबचे लाखो सभासद कंपनीच्या जाळ्यात आर्थिकदृष्ट्या फसले आहे. महिनाभरात पंतप्रधान कार्यालयाला राज्यातील गुंतवणुकदार वेदनापत्र पाठविणार असून त्यांना परतावा मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा इन्व्हेस्टर्स फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी दिला.
राष्ट्रशक्‍ती संघटना व निर्धार इन्व्हेस्टर्स वेल्फेअर फोरमच्या वतीने कंपनीचे मंचर, नारायणगाव, पेठ, चाकण, खेड, आळेफाटा, शिरूर, निघोज, संगमनेर, अकोले, श्रीगोंदा येथील गुंतवणुकदार व मार्केटींग प्रतिनिधींचा मेळावा मंचर येथील गणराज मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी राष्ट्रशक्‍ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर दारवटकर, शहाजी भाऊ, एन. जी. गावडे, एम. बी. मोरे, एस. एल. साळवी यांनी मार्गदर्शन केले.
देशभरातील सुमारे 50 ते 55 लाख गुंतवणुकदार पॅनकार्ड क्‍लब या कंपनीच्या जाळ्यात फसले आहेत. तसेच राज्यातील सुमारे 50 लाख गुंतवणुकदारांच्या परताव्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे. याबाबत कोणत्याही खासदाराने संसदेमध्ये प्रश्‍न उपस्थित केला नाही. या निषेधार्थ राज्यातील सर्व खासदारांच्या घराबाहेर लवकरच घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा गुंतवणुकदारांनी केला आहे.सेबी सारखी मुजोर संस्था मनमानी कारभार करत असून स्पष्ट उत्तरे देण्याचे टाळत आहे. मेळाव्यात आलेले प्रतिनिधी व गुंतवणुकदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एस. तांबोळी यांनी केले. तर डी. बी. मुंज यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)