फसवणुकीचा बदला घेण्यासाठी ‘तिने’ केली प्रियकराच्या मुलीची हत्या ?

मुंबई : नालासोपाऱ्यातून अपहरण करुन चिमुकलीची गुजरातमध्ये झालेली हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. हत्येप्रकरणी आरोपी अनिता वाघेराला अटक करण्यात आली आहे.

अनिता आणि संतोष या दोघांमध्ये काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण आधीपासूनच विवाहित असलेला संतोष लग्नाचे आमिष दाखवून आपला गैरफायदा घेत असल्याची जाणीव अनिताला झाली. दोन वर्षात दोन वेळा झालेला गर्भपात आणि लग्नाचे स्वप्न भंगल्याचा राग मनात धरुन अनिताने संतोषची मुलगी अंजलीचे अपहरण केले. गुजरातमधल्या नवसारी रेल्वे स्थानकाच्या शौचालयात गळा दाबून अनिताने अंजलीची हत्या केली. या प्रकरणाचा तुळिंज पोलिसांनी 48 तासांमध्ये छडा लावला आणि आरोपी अनिताला राहत्या घरातून अटक केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)