फळे स्पर्धेत 40 स्पर्धकांचा सहभाग

कराड : यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनात फळे स्पर्धेत मांडण्यात आलेली फळांचे परीक्षण करताना परीक्षक.

रामफळ, आवळा, सिताफळ प्रथम

कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – येथे यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी सोमवारी घेण्यात आलेल्या फळे स्पर्धेत जिल्ह्यातील 40 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांचा सहभाग पाहून आयोजकांनी प्रथम तीन क्रमांकाबरोबरच उत्तेजनार्थही क्रमांक काढले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक-छाया पावशे (जखिणवाडी – रामफळ), दत्तात्रय परायणे (सोमर्डी-आवळा), गोपाळ गोरे (आंधळी- सिताफळ) यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक – अरूण घनवट (पिंपळ – डाळिंब), शिवाजी सोनवणे (शिंदेवाडी- चिक्‍कू), स्वरूप सस्ते (निगडी- डाळिंब) यांना मिळवला. तृतीय क्रमांक – प्रकाश शिंदे (परखंडी -लिंबू), विजय लिगाडे (उरगी – ड्रॅगनफळ), दादासो धुमाळ (धुमाळवाडी-सिताफळ), उत्तेजनार्थ क्रमांक महोदव भोईटे (हिंगणगाव-नारळ), दत्तात्रय मलकमीर (बिदाल -ऍपलबोर), अभिनव शिंदे (परखंडी-आवळा), शरफुद्दीन काझी (धावडवाडी-चिंच), सिद्धेश मगर (वाझोली-पपई), शिवाजी कदम (निगडी-द्राक्षे) यांनी पटकावला.
परीक्षक म्हणून शंकर खोत, सुधीर चिवटे, विकास देशमुख, राजन धोपटे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)