फळभाज्यांची आवक आणि मागणीही घटली

काकडी, वांगी, बीट स्वस्त : मागणीच नसल्याने कांदाही स्थिर

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – सलग दोन आठवडे विक्रमी आवक झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक घटली आहे. पुणे विभागात सुरू असलेल्या पावसामुळे ही आवक घटली आहे. तरीही भाज्यांना मागणी नसल्यामुळे आले, काकडी, वांगी आणि बीटच्या भावात सुमारे 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मागणी वाढल्यामुळे मटार आणि पावटाच्या भावात मात्र वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी चाळीशी पार केलेल्या कांद्याची आवक मात्र घटली आहे. तरीही मागणीच नसल्याने कांद्याच्या भावातही घट झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी सुमारे 225 ट्रक भाजीपाल्यांची आवक झाली. त्यामध्ये परराज्यातून आलेल्या मालामध्ये आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो शेवगा, गुजरात आणि कर्नाटक येथून 20 ते 22 टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेश येथून 7 ते 8 ट्रक गाजर, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग, गुजरात आणि कर्नाटक येथून 8 ते 10 ट्रक कोबीची आवक झाली आहे. स्थानिक विभागातून सातारी आल्याची 1500 ते 1600 पोती, टॉमेटो पाच ते साडे पाच हजार पेटी, फ्लॉवर 15 ते 16 टेम्पो, कोबी 15 ते 16 टेम्पो, सिमला मिरची 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, पावटा 6 ते 7 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंगाची 100 पोती, पुरंदर, वाई, सातारा आणि पारनेर येथून मटारची 1 हजार पोती, कांद्याची 50 ते 60 ट्रक, आग्रा, इंदौर आणि गुजरात येथून बटाट्याची 45 ते 50 ट्रक आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची पाच ते साडे पाच हजार गोणीची आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 170-210, बटाटा : 60-100, लसूण :250-450, आले सातारी : 180-240, भेंडी : 150-200, गवार : गावरान व सुरती 150-220, टोमॅटो : 200-300, दोडका : 100-200, हिरवी मिरची : 200-250, दुधी भोपळा : 60-120, चवळी : 150-200, काकडी : 60-100, कारली : हिरवी 150-200, पांढरी : 100, पापडी : 140-160, पडवळ : 200-220, फ्लॉवर : 60-100, कोबी : 50-100, वांगी : 200-300, डिंगरी : 140-150, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची :150-200, तोंडली : कळी 240-250, जाड : 100-110, शेवगा : 300, गाजर : 160-200, वालवर : 200-220, बीट : 150-180, घेवडा : 150-200, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 150-200, ढेमसे : 180-200, मटार : स्थानिक :200-300, पावटा : 150-200, भुईमंग शेंगा 400-450, तांबडा भोपळा : 60-100, सुरण :250-280, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)