फळभाजीत भोपळा तर पालेभाजीत शतावरी ठरली अव्वल

यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनात जिल्ह्यातून स्पर्धकांचा सहभाग

कराड – येथे यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी बुधवारी घेण्यात आलेल्या फळभाजी व पालेभाजी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही स्पर्धांमध्ये तीनही क्रमांकांना विभागून क्रमांक द्यावे लागले. फळभाजी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम – पृथ्वीराज पवार (पारगाव भोपळा), सयाजी डफळे (वजरोशी-वांगी), लक्ष्मण जाधव (तासवडे ढोबळी मिरची) यांना विभागून देण्यात आला.

द्वितीय – तेजस जाधव (साप-वांगी), लालसिंग पिसाळ (बावधन- टोमॅटो), जयश्री पाटील (चचेगाव – मिरची) यांना मिळाला. तृतीय क्रमांक – अशोक माने (राजाचेकुर्ले-भोपळा), भरत चव्हाण (कोपर्डेहवेली-काकडी), विष्णू शिंदे (पाठरवाडी – कांदा) यांनी क्‍र्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ क्रमांक गणपत कृष्णा ओंबाळे (केंडबे-झुकेणी), महादेव पाटील (अंबवडे – टोमॅटो) यांनी मिळवला.

पालेभाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक – आकाश जाधव (सैदापूर-शतावरी )व शरद सावंत (लिंब-पार्सली), द्वितीय क्रमांक विजयादेवी सुतार (पोतले – हादगा) व आयुष डफळे (वजरोशी-मेथी), तृतीय क्रमांक – सुरेश निंबाळकर (ओझर्डे – पॉनशाय), सुनिल जानकर (कापिल-फ्लॉवर) यांनी मिळवले. उत्तेजनार्थ क्रमांक – सुजित मापारी (कळंबे – ब्रोकोली), शिवाजी डफळे (वजरोशी -चाकवत), पांडुरंग पाटील (तांबवे करडई) यांना क्रमांक मिळाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभारी अधिकारी प्रा. डॉ. कांबळे, बापूसाहेब शेळके, शंकर खोत, सुधीर चिवटे, विकास देशमुख, राजन धोपटे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)