फळबाजार वगळता मार्केट यार्डातील व्यवहारावर भारत बंदचा फारसा परिणाम नाही – फळबाजारात मात्र आवक घटली

पुणे – इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवर्निमाण सेनेने आणि इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदचा मार्केट यार्डवर फारसा परिणाम झाला नाही. फळ विभाग वगळता भाजीपाला, भुसार आदी विभागात नेहमीच्या तुलनेत आवक-जावक कायम होती. तर फळे विभागात नेहमीच्या तुलनेत केवळ 25 टक्केच आवक झाली.
सोमवारी (दि. 10 सप्टेंबर) मार्केट यार्डातील तरकारी विभागात 50 ते 60 गाड्यांची आवक झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत स्थिर असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, सोमवारी मार्केट यार्डात नेहमीच कमी आवक होत असते. आज झालेली आवक नेहमीच्या तुलनेत आहे. बाजारात आलेला भाजीपाला विकला गेला आहे. भावही रविवारच्या (दि.9 सप्टेंबर) तुलनेत स्थिर आहेत. तर फळे विभागाचे उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, बंदच्या भीतीमुळे फळबाजारात मात्र शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात माल आणला. नेहमीच्या तुलनेत केवळ 25 टक्केच मालाची आवक झाली. तरीही रविवारच्या तुलनेत फळांचे भाव स्थिर आहेत. आणलेल्या मालाची विक्री झाली. तर भुसार बाजारावरही भारत बंदचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दी पुना मर्चंट्‌स चेंबरचे सहसचिव विजय मुथा यांनी सांगितले. नेहमीच्या तुलनेत आवक-जावक सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)