फलोदे येथे कार्यशाळा उत्साहात

मंचर- फलोदे (ता. आंबेगाव) येथे साक्षरता वर्गासाठीचे पुस्तक बनविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाळकृष्ण बोकील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसाच्या कार्यशाळेत साक्षरता वर्गात शिकविण्यासाठीचे अध्यापन साहित्य, अध्यापन पद्धत व मानवी मेंदूची रचना इत्यादी विषयक चर्चा व साहित्य विकसित करण्यात आले. आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागात एकून 17 साक्षरता वर्ग सुरू होणार आहेत. रोटरी क्‍लब, इनरव्हील क्‍लब, आदिम संस्था व मेरिट सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे साक्षरता वर्ग सुरू होत आहेत. साक्षरतेचे पुस्तक याच भागातील भाषा आणि अनुभवविश्व सामावून तयार होत आहे.साक्षरता वर्गातील हा नवीन प्रयोग साक्षरता चळवळीसाठी महत्वपूर्ण ठरेल, असे मत डॉ. बाळकृष्ण बोकील यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. अमोल वाघमारे यांनी ही मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)