फलोदेत श्रमदानाने बांधलेली विहीर तुडुंब भरली

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागातील फलोदे येथे श्रमदानातून बांधण्यात आलेली विहीर पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे, त्यामुळे या भागातील पाणी टंचाईची समस्या सुटण्यासाठी मदत झाली आहे.
फलोदे ग्रामपंचायतीचा काही निधी, रोटरी क्‍लब निगडी यांची आर्थिक मदत आणि ग्रामस्थांचे श्रमदान यातून पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर मागील चार महिन्यात बांधण्यात आली.
ही विहीर जुलै महिन्यातच संपूर्ण पाण्याने भरलेली आहे. या विहीरीच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)