फलटण हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

फलटण ः गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिस देऊन सत्कार करताना मान्यवर.

फलटण, दि. 16 (प्रतिनिधी) – फलटण शहरातील जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित फलटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण फलटण येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड. एन. एम. यादव यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींनी राष्ट्रगीते सादर केली. विद्यालयाचे प्राचार्य बी. एस. खवळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी इयत्ता दहावी- बारावी परीक्षेतील प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. गणवेश वितरण पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी फलटण एस. टी. आगारातील सुहास सोनवणे, पुणे येथील लघु उद्योजक राजेंद्र भापकर, कोळकी, दीपक शेठ दोशी, ग्रामपंचायत सदस्य उमेश काशिद, भाजप जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष राजेश हेंद्रे, संदीप जाधव, सौ. नैना भगत, सौ. रासकर मॅडम, सौ. नामदास मॅडम, भाजप विस्तारक संतोष पानस्कर यांच्यासह पालक, माजी विद्यार्थी आणि विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सी. जी. कदम यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)