फलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी

माजी आमदार बाबुराव माने यांच्यासह भाजपच्या इच्छुकांची चाचपणी

पिंपोंडे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी फलटण कोरेगांव मतदार संघात शिवसेनेने मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे. माजी आमदार बाबुराव माने हे या मतदार संघातून इच्छूक आहे.त्यांच्यासह युती न झाल्यास भारतीय जनता पक्षातील काहीजण या मतदार संघातून चाचपणी करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघ हा फलटण तालुका पूर्ण व कोरेगांवचा काही भाग असा मिळून मतदार संघाची रचना झालेली आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेत कोरेगांव तालुक्‍यातील काही भाग हा फलटण मतदार संघाला जोडला आहे. त्यामुळे उत्तर कोरेगांव भागाचा विकास होईल व येथील पाणीप्रश्र संपेल अशी अपेक्षा येथील जनतेला होती. ही अपेक्षा फोल ठरली आहे.

शिवसेनेचे माजी आ. बाबुराव माने यांनी मतदार संघातला आपला वावर वाढवला आहे. जनतेच्या प्रश्रनासाठी आपण पुन्हा या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्‍न , मत्तदार संघातील विकासांचे प्रश्र फक्त शिवसेनेच्या माध्यमातून सुटू शकतात असे शिवसैनिक सांगत आहेत. बाबुराव माने यांच्या शिवाय सध्यातरी शिवसेनेतून दुसरे कोणाचे नाव पुढे नाही.

उत्तर कोरेगावातील गावांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे.पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पण दुष्काळग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी कोणी राजकारणी आला नाही.वसना प्रकल्प हा युती काळातीलच आहे. मात्र तो पूर्ण होण्यासाठी दहा ते बारा वर्ष लागली हे दुर्दैव आहे. प्रकल्प पूर्ण होऊन सुध्दा मात्र आता लाईटबिलावाचुन पाणी प्रश्‍न सुटला नाही. तर दोन चार गांवाना पाणी पुरवठा करणारे नादवळ धरण हे देखील जवळपास कोरडे पडले आहे.

या भागातील जनतेशी संवाद साधून, पाणीप्रश्‍नांना बाबत आवाज उठविणार असल्याचे बाबुराव माने यांनी सांगीतले. जनतेच्या प्रश्‍नांची मला जाण आहे. सर्वसामान्याची सेवा करण्यासाठीच निवडणूक लढवणार असल्याचे माने यांनी सांगितले. दरम्यान भारतीय जनता पक्षाने या भागात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चाचपणी सुरु केली असून विधानसभा लढवण्याची तयारी भाजपच्या इच्छुकांनी सुरु केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)